महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारती द्वारे पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवड करण्यासाठी लिंक द्वारे माहिती मागविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारती ही संस्था 1967 पासून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक व पूरक साहित्य तयार करत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आलेले आहे. या अनुषंगाने पाठ्यपुस्तकांच्या व पूरक साहित्याच्या लेखन-संपादन, चित्राकृती इत्यादी कामासाठी शैक्षणिक स्तर व माध्यमनिहाय विविध विषयांच्या व भाषांच्या समित्या गठीत करण्यात येणार आहेत. यासाठी भाषा व विषय समित्यांवर सदस्यांची निवड करणे तसेच आवश्यकतेनुसार पाठ्यपुस्तकांतील चित्राकृती तयार करण्यासाठी चित्रकारांची माहिती मिळवणे या उद्देशाने सोबतच्या लिंकवर अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी त्या त्या विषयातील तज्ज्ञ आणि इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी आपले अर्ज ऑनलाईन भरावेत. निवड समितीमार्फत योग्य त्या पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.
- किरण केंद्रे
कार्यकारी संपादक (किशोर)
जनसंपर्क अधिकारी
पाठ्यपुस्तक मंडळ, बालभारती
पुणे
Join whatsApp group
पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवडीसाठी अर्ज करण्यासाठी लिंक
पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवडीसाठी अर्ज
प्रथम वरील लिंक वर मोबाईल क्रमांक टाकून OTP द्वारे पडताळणी करून घ्या. त्यानंतर विषय समिती स्तर किंवा चित्रकार निवडा. विषय निवडा.
त्यानंतर शिक्षकांनी स्वत:ची वैयक्तिक माहिती भरावी. महाराष्ट्रातील वास्तव्याचा पत्ता टाकावा.
संपर्क तपशील टाकावा. इमेल व WhatsApp
शेवट save करावे.
0 Comments