Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षक भरती - रिक्त पदांच्या 50% पदे भरणार! | शिक्षकांचा फोटो वर्गाऐवजी शाळेच्या परिचय फलकावर

शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक मा. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंडळ पुणे येथे घेण्यात आली.  या वेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांच्यासह उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


शिक्षक भरती - रिक्त पदांच्या ५० टक्के शिक्षकांची पदे भरण्यात येणार

'राज्यातील काही शाळांमध्ये दोन विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक कार्यरत आहे, तर काही शाळांमध्ये शिक्षक नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. यातून मध्यम मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता लक्षात घेऊन, रिक्त पदांच्या ५० टक्के शिक्षकांची पदे भरण्यात येईल, तसेच शिक्षक भरतीसोबतच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहेत. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याला प्राधान्य देण्यात येईल. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दिली. 

आपले गुरुजी - शिक्षकांचा फोटो वर्गात लावणे बाबत... 

शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक शिक्षकांचे फोटो वर्गात लावण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु या निर्णयास शिक्षक संघटनांनी विरोध केला होता. त्यामुळे आता शिक्षकांचा फोटो वर्गात लावण्याऐवजी शाळेतील परिचय फलकावर शिक्षकांचे छोट्या आकाराचे छायाचित्र लावण्यात येईल. असे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले.

पाठ्यपुस्तकाला वह्यांची जोड. पुस्तकात कोरी पाने समाविष्ट करणार. 

शालेय विद्यार्थ्यांच्या दफ्तरांचे ओझे कमी करण्यासाठी, पुढील वर्षीपासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची जोड देण्यात येणार आहे. 

पाठ्यपुस्तकाला वह्यांची जोड बाबत सविस्तर माहिती पहा. Click Here

Post a Comment

0 Comments

close