Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शालेय क्रीडा स्पर्धा 2022-23 | शालेय व इतर स्पर्धामध्ये 93 खेळ प्रकाराचे आयोजन. खेळप्रकाराची यादी पहा.

कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे सन 2020-21 व 2021-22 या कालावधीत शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन होऊ शकले नाव्हते. सन सन 2022-23 या वर्षात शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यास शासन मान्यता प्रदान करण्याबाबत संचालनालया द्वारा प्रस्तावित करण्यात आले होते.

तसेच सन 2022-23 या वर्षांत भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारा राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धाच्या आयोजनाबाबत अनिश्चितता दिसून येत असल्याने, राज्यातील विविध खेळप्रकारातील खेळाडूंना विविध प्रकारामध्ये राज्यस्तरापर्यंतच्या क्रीडा स्पर्धामधील सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यस्तरापर्यंतच्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनांस शासनाने मान्यता प्रदान केली आहे. 

शालेय क्रीडा स्पर्धा 2022-23 आयोजनास मान्यते बाबत परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here


सन 2022-23 मध्ये शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश केलेल्या खालील खेळप्रकारांच्या शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर अशा क्रमाने करणे प्रस्तावित करण्यात येत आहे.

93 खेळ व खेळ प्रकाराची यादी डाउनलोड करा. Click Here

उपरोक्त 93 प्रकारांपैकी सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल व नेहरू हॉकी या स्पर्धांचे आयोजन पुर्ण झाले असून उर्वरीत 91 शालेय क्रीडाप्रकारांचे आयोजन प्रचलित नियमानुसार करावे. त्यापैकी प्रचलित नियमानुसार तालुकास्तरावर 10 खेळप्रकार, जिल्हा व विभागस्तरावर एकुण 11 क्रीडाप्रकारांचे आयोजन करावे.


शालेय क्रीडा स्पर्धा संपूर्ण माहिती - Click Here

उपरोक्त तक्त्यात नमूद अ.क्र.१ ते ४९ येथील खेळांच्या आयोजनासाठी संदर्भ क्रमांक १ मधील तरतुदीनुसार निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच अनुक्रमांक ५० ते ९३ येथील खेळ प्रकारांचे आयोजन हे संदर्भ क्रमांक २ ते ७ मधील नमुद अटी व शर्थीच्या अधीन राहून संबंधित खेळ संघटनेच्या संपूर्णपणे तांत्रिक व आर्थिक जवाबदारीने करावे.

शासनामार्फत ज्या खेळ प्रकारांच्या शालेय क्रीडा स्पर्धेतील आयोजनास मान्यता देण्यात आली आहे, त्या खेळ प्रकारामधून महाराष्ट्र राज्याचा संघ, शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी ज्या कार्यप्रद्धतीनुसार निवडला जातो, त्या कार्यपद्धतीनुसार निवडण्यात यावा. ५० ते ९३ अनुक्रमांकावरील खेळांचे वयोगट व स्पर्धा आयोजन संदर्भातील इतर आवश्यक सुचना लवकरच कळविण्यात येतील.

केंद्रप्रमुख पद भरतीसाठी आवश्यक पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप, माध्यम याविषयी तपशीलवार माहिती - Click Here

Post a Comment

0 Comments

close