शिक्षण संचालनालयातील शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र कक्षाने दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोजी शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांच्या बँक व पी एफ एम एस प्रणालीवर नोंदणीकृत खात्याची माहिती सादर करणेबाबत पत्र निर्गमित केले आहे.
शालेय पोषण आहार योजने अंतर्गत शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना गरम ताजा आहार उपलब्ध करून देण्यात येत आहे. शाळास्तरावर विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहाराची देयके (इंधन भाजीपाला व धान्यादी माल ) अदा करावयाची आहेत. सदर देयकांची अदायगी 100% पीएफएमएस प्रणालीमार्फत करावयाची असल्याने सदर कामकाजाकरिता आपल्या जिल्ह्यातील योजनेस पात्र व पी एफ एम एस प्रणालीवर नोंदणीकृत सर्व शाळांची सोबत जोडण्यात आलेल्या नमुन्यात माहिती शिक्षण संचालनलायस उपलब्ध करून देण्यात यावी. सदर माहिती जिल्हा लॉगिन वर उपलब्ध आहे. सदर माहिती केवळ इंग्रजीमध्ये तसेच एम एस एक्सेल फॉरमॅटमध्ये पाठवण्यात यावी.
PFMS प्रणाली लिंक व संपूर्ण माहिती - Click Here
सर्व जिल्ह्यांना सूचना आहे की सदरची माहिती शाळांना द्यायचे विहित वेळेत अदा करणे करिता आवश्यक असल्याने याबाबत विलंब होणार नाही याची योग्य ती दक्षता घ्यावी. ज्या जिल्ह्यांची माहिती प्राप्त होणार नाही अशा जिल्ह्यातील शाळांना अनुदान मिळण्यास विलंब झाल्यास त्यांची सर्व जबाबदारी संबंधितावर राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
माहिती सादर करण्याचा नमूना डाउनलोड करा.- Click Here
परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here
0 Comments