Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खाजगी विनाअनुदानित वरुन अनुदानित शाळा किंवा तुकडीवर बदली करण्याबाबतच्या तरतुदीस स्थगिती

राज्यातील खाजगी विनाअनुदानित वरुन अनुदानित शाळा किंवा तुकडीवर बदली करण्याबाबत शासन अधिसूचना दि.08.06.2020 व शासन निर्णय दिनांक 01.04.2021 मधील तरतूदीस तूर्त स्थगिती देण्याबाबत 1 डिसेंबर 2022 रोजी शासन निर्णय घेण्यात आला आहे. 

राज्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील कर्मचाऱ्यांना त्यांची कर्तव्ये परिणामकारकरित्या व कार्यक्षमरित्या पार पाडणे शक्य व्हावे, म्हणून त्यांना सेवेत शाश्वती व स्थैर्य मिळवून देण्याच्या दृष्टीने, कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या शर्ती यांचे विनियमन महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शती) विनियमन अधिनियम, १९७७ अन्वये करण्यात आले आहे. सदर अधिनियमांतर्गत महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ तयार करण्यात आली आहे. सदर नियमावलीतील नियम क्र. ४१ नंतर विना अनुदानित किंवा अंशत: अनुदानित शाळा अथवा तुकडीमधून अनुक्रमे अंशत: अनुदानित किंवा पूर्णत: अनुदानित शाळा अथवा तुकडीतील रिक्त पदांवर बदली करण्याबाबत उपनियम (४१- १) शासन अधिसूचना क्रमांक संकीर्ण-२०१९/प्र.क्र.३४१ / टीएनटी-१, दिनांक ०८.०६.२०२० अन्वये दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये अतिरिक्त शिक्षक नसल्याची खात्री, सेवाज्येष्ठतेचे पालन, विषयाची गरज लक्षात घेणे.. बदलीपूर्वी शिक्षकाच्या नियुक्तीस मान्यता दिलेली असावी, बदली रिक्त पदावरच करणे. या तरतुदींचे पालन करणे आवश्यक असल्याचे नमूद आहे. तसेच या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०१२/प्र.क्र.३४१ /टि.एन.टि -१, दिनांक ०१.०४.२०२१ अन्वये सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

01.04.2021 चा शासन निर्णय डाउनलोड करा. -Click Here


परंतु शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीवर बंदी असताना मूळ नियमावलीत समाविष्ट करण्यात आलेला अधिनियम क्र. उक्त शासन अधिसूचना दिनांक ०८.०६.२०२० व शासन निर्णय दिनांक ०१.०४.२०२1 मधील तरतूदींचे पालन न करता विनाअनुदानित पदावरून अंशत: अनुदानित किंवा अनुदानित शाळा किंवा तुकडीवर शिक्षकांची बदली करून अशा शिक्षकांना शासनाच्या १०० टक्के अनुदानित पदावरून वेतन देण्याबाबत अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत:


शासन परिपत्रक- 01.12.2022

राज्यातील खाजगी शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीवर बंदी असतानाच्या कालावधीत सन अधिसूचना, दिनांक ०८.०६.२०२० अन्वये मूळ नियमावलीत समाविष्ट करण्यात आलेला उपनियम क्र. (४१-१) व त्याअनुषंगाने निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय, दिनांक ०१.०४.२०२१ मधील तरतूदींचे पालन न करता विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळा अथवा तुकडीमधून अनुक्रमे अंशत: अनुदानित किंवा पूर्णत: अनुदानित शाळा अथवा तुकडीतील रिक्त पदावर बदली होत असल्याची बाब निदर्शनास आल्याने पुढीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत:-

०१. शासन अधिसूचना क्रमांक संकीर्ण-२०१९/प्र.क्र. ३४१/ टीएनटी-१, दिनांक ०८.०६.२०२० मधील नियम क्र. ५ मधील उपनियम (४१-१) व शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०१९ / प्र.क्र.३४१/ टि.एन.टि.-१, दिनांक ०१.०४.२०२१ यांस पुढील आदेश होई तोपर्यंत स्थगिती देण्यात येत आहे. 

०२. सबब अशी स्थगिती दिल्या नंतरही जे शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक आणि विभागीय शिक्षण उपसंचालक वैयक्तिक मान्यता देण्याची कार्यवाही करतील त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) (शिस्त व अपिल) नियम, १९७९ मधील तरतुदीनुसार शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल.

कायम शब्द वगळलेल्या खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा 20% अनुदानास पात्र

०३. स्थगिती कालावधीत काही न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास त्यामध्ये प्रकरण निकाली काढण्याची तातडी आवश्यक असल्याची खात्री झाल्यास त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव शासनास आयुक्त, शिक्षण यांचेमार्फत आदेशार्थ व निर्णयार्थ सादर करण्यात यावा.

०४. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील शिक्षकांच्या बदलीबाबत संदर्भाधीन अधिसूचना, दिनांक ०८.०६.२०२० व शासन निर्णय दिनांक ०१.०४.२०२१ मधील तरतूदींचे पालन झाले आहे किंवा नाही, तसेच पदभरती बंदीच्या काळात बदली झाली आहे किंवा कसे, याबाबत शहानिशा करुन सविस्तर अहवाल शिफारशीसह आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य यांनी शासन परिपत्रकाच्या दिनांकापासून ३ महिन्याच्या आत शासनास सादर करावा.

०५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२२१२०११४५८२९७१२१ असा आहे.




खाजगी विनाअनुदानित वरुन अनुदानित शाळा किंवा तुकडीवर बदली करण्याबाबतच्या तरतुदीस स्थगिती देणेबाबत शासन निर्णय - Click Here

Post a Comment

0 Comments

close