शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्त्याखालील क्षेत्रीय कार्यालयांनी फक्त ई-ऑफीस प्रणालीच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्याबाबत शासन निर्णय 06 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आला आहे. त्यामुळे आता यापुढील सर्व पत्रव्यवहार हा केवळ ई-ऑफीस माध्यमातून, शासकीय ई-मेल (NIC/GOV) द्वारेच पाठविण्यात येणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भाधीन क्र. २ येथील दि. २ फेब्रुवारी, २०२३ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये निर्गमित केलेल्या सूचनांव्दारे मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभागांमधील तसेच क्षेत्रीय कार्यालयांतील शासकीय कामकाजात दि. १ एप्रिल २०२३ पासून ई-ऑफीस प्रणालीचा वापर प्रभावीपणे करावयाचा आहे. मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्त्याखालील कार्यालयांमध्ये प्राप्त होणा-या टपालांवर तात्काळ कार्यवाही व्हावी व वेळेचा अपव्यय होऊ नये. याकरिता दि. १ फेब्रुवारी, २०२३ पासून मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागांत तसेच क्षेत्रीय कार्यालयांतील पत्रव्यवहार करतांना प्रत्येक टपाल ई-ऑफीस माध्यमातून पाठविण्याबाबतची कार्यवाही काटेकोरपणे करण्याबाबतच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना या परिपत्रकाच्या आधारे सूचना निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती. त्या अनुषंगाने सदर परिपत्रक निर्गमित करण्यात येत आहे.
शासन परिपत्रक :-
शासकीय कार्यालयांमध्ये ई-ऑफिसचा वापर अधिकाधिक वाढण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाच्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय कार्यालयांना पुढीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत..
शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्त्याखालील कार्यालयांमध्ये प्राप्त होणा-या टपालांवर तात्काळ कार्यवाही व्हावी व वेळेचा अपव्यय होऊ नये, याकरिता पत्रव्यवहार करतांना प्रत्येक टपाल ई-ऑफीस माध्यमातून पाठविण्याबाबतची कार्यवाही काटेकोरपणे करण्यात यावी. शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्त्याखालील सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी खालील अपवाद वगळता सर्व पत्रव्यवहार हा केवळ ई-ऑफीस माध्यमातून, शासकीय ई-मेल (NIC/GOV) द्वारेच पाठवावा. फक्त खालील टपाल हा हस्तबटवड्याने पाठविण्यात यावा.
(अ) नकाशे, बांधकाम आराखडा,
(आ) पुस्तके,
(इ) ज्या प्रकरणी मूळ कागदपत्रे पाठविणे अनिवार्य असेल, अशी मूळ कागदपत्रे किंवा दस्त उदा. अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके, मूळ वैद्यकीय देयके इ.
२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२३०२०६१९०३२९२३२१ असा आहे.
0 Comments