Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बीजमाता - राहीबाई पोपेरे | पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे या गावी राहीबाई पोपेरे यांचा जन्म 1964 साली झाला. महिला शेतकरी आणि पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक म्हणून राहीबाई यांना ओळखले जाते. देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांचा भारत सरकारने इ.स. 2020 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.


राहीबाई मूळच्या याच गावच्या. राईबाईंच्या ‘देशी बियाण्यांच्या बँकेत’ आज ५२ पिकांचे ११४ वाण आहेत. त्यांचे कार्य पाहता त्यांचा 'सीड मदर' म्हणजेच 'बीजमाता' असाही उल्लेख केला जातो.




राहीबाई यांच्याकडे अनेक प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. राहीबाईकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते ते मुळ स्वरूपातील आहे. त्यांच्याकडे फक्त वालाचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत. त्यांनी तीन हजार स्त्रिया व शेतकरी यांचा बचतगट बनवला आहे. त्यांच्या मार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. हे पारंपारिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे मुळ नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे नाही. 


देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने इ.स. २०२० साली पद्मश्री पुरस्कार पुरस्कार दिला. इ.स. २०२०चा हा पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. तसेच बीबीसीने शंभर प्रभावशाली महिलांत त्यांचा समावेश केला आहे.

राहीबाई पोपोरे,
जागतिक महिला दिन,
बीजमाता
seed mother Rahibai popere
international womens day
कर्तृत्ववान महिला

Post a Comment

0 Comments

close