Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षण विस्तार अधिकारी जाहिरात 2023 | रिक्त पदांची माहिती

शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख भरती साठी रिक्त पदांची माहिती मागविण्यात आली आहे. तालुकानिहाय मंजूर पदे किती? कार्यरत किती? रिक्त पदे किती? याबाबतचा तपशील मागविला आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या गुणोत्तर वाढीसाठी क्षेत्रिय स्तरावरील शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख ही पदे महत्वाची असून राज्यामध्ये सदरची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे.

या विभागाच्या दिनांक १०.६.२०१४ च्या अधिसूचनेतील तरतुदीनुसार विभाग स्तरावर विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदांवरील रिक्त पदांचा आढावा घेऊन सदरची पदे भरण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये विभागीय आयुक्त यांना निर्देश दिलेले होते. 


शिक्षण विस्तार अधिकारी जाहिरात 2023 - जिल्हानिहाय पदे - Click Here


पद भरती शासन अधिसूचना PDF ( 10.06.2014) - Click Here

दिनांक १०.६.२०१४ च्या अधिसूचनेनुसार विस्तार अधिकारी (शिक्षण) (श्रेणी-२) व विस्तार अधिकारी (शिक्षण) (श्रेणी-३) संवर्गातील तालुकानिहाय मंजूर पदे, कार्यरत पदे व रिक्त पदांचा तपशील est14-rdd@mah.gov.in या ई-मेल वर दिनांक १०.४.२०२३ पर्यंत पाठविण्यात यावा, याबाबत रिक्त पदांची माहिती तात्काळ सादर करण्यात यावी याबाबत शासनाने आदेशित केले आहे. 

शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख भरती 2023 | रिक्त पदांची माहिती सादर करणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close