Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2025-26 प्रस्तावासाठी आवश्यक अटी | रजिस्ट्रेशन लिंक | सुधारित शासन निर्णय डाउनलोड करा.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2025-26 आवश्यक अटी वाचा | रजिस्ट्रेशन लिंक | शासन निर्णय डाउनलोड करा.


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सुधारित निकष शासन निर्णय - 16 जुलै 2025 डाउनलोड करा. Click Here


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रस्तावासाठीच्या आवश्यक अटी :

Prerequisites for Krantijyoti Savitribai Phule State Teacher Award Proposal


1.शिक्षकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक 

2.मुख्याध्यापक पदावरील व्यक्तीने नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे गटशिक्षणाधिकारी /प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक 

3.शिक्षक /मुख्याध्यापकाची एकूण सलग सेवा किमान १० वर्षे आवश्यक 

4.शिक्षकाचे /मुख्याध्यापकाचे  मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल पडताळणी साठी सादर करावेत.

5.विभागीय चौकशी सुरु नसल्याचे शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र 

6.शिक्षकांनी केलेल्या लगतच्या ५ वर्षाच्या  सेवा कालावधीतील कार्याचे मूल्यमापन राज्यस्तर व जिल्हास्तर समितीकडून गुणांकनाद्वारे करण्यात येईल 

7.प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची आवेदने स्वीकारली जाणार नाहीत 

8.शिक्षकाच्या सेवेतील कार्यपद्धतीबाबत व निर्व्यसनी असलेबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

९. एकदा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाही. 
१०. एक शिक्षक कोणत्याही एकाच प्रवर्गासाठी अर्ज करण्यास पात्र असेल . एकापेक्षा जास्त संवर्गात अर्ज केल्यास त्यांचे अर्ज निवड प्रक्रियेतून रद्द केला जाईल.
११. शिक्षकांनी सादर केलेली माहिती खोटी अथवा प्रमाणपत्रे बनावट असल्याचे आढळून आल्यास आवेदन  रद्द करण्यात येईल.
१२.शिक्षकांनी स्वतःचे तीन रंगीत फोटो व स्व: प्रमाणपत्र सादरीकरणावेळी जमा करावेत.

Post a Comment

1 Comments

close