Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निपुण शपथ PDF - निपूण भारत अभियानाने अपेक्षतली सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी निपुण शपथ

"पहिले पाऊल" (स्टार्स प्रकल्प) अंतर्गत शाळापूर्व तयारी अभियानात कार्यरत माता गटांची कौतुक व या वर्षाची निपुण लक्ष गाठण्यासाठीची सुरुवात दि.१५/०८/२०२३ रोजी निपुण शपथ घेऊन करावे. निपुण भारत मिशन शपथ PDF | Nipun Bharat Mission Pledge PDF

"स्टार्स प्रकल्प" अंतर्गत इयत्ता पहिलीत येणाऱ्या मुलांसाठी "पहिले पाऊल" शाळापूर्व तयारी अभियान हे आपणा सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या राबविला गेला. आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे दिनांक २४ ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत शाळास्तरावर इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या मुलांकरीता पहिला मेळावा व २० जून २०२३ ते ५ जुलै, २०२३ या कालावधीत दुसरा मेळावा घेण्यात आले.

निपुण भारत अभियान शासन निर्णय PDF - Click Here

विद्याप्रवेश ( FLN) - शाळापूर्व तयारी शासन परिपत्रक व कृतीपत्रिका PDF डाउनलोड करा. Click Here


माता पालक गट आयडिया व्हिडिओ गट आयडिया व्हिडिओ - Click Here


या मेळाव्याचे खूप जल्लोषात आयोजन महाराष्ट्रात करण्यात आले. सदर कार्यक्रमामुळे शासन, शाळा, ग्रामपंचायत, माता गट, लीडर माता स्वयंसेवक व ग्रामस्थ या मुख्य घटकांच्या समन्वयाने व पुढाकाराने गावात लक्षणीय शैक्षणिक वातावरण तयार झाल्याचेही दिसून आले. आपल्या सर्वांच्या सहभागाने व उत्तम प्रतिसादाने आपण "पहिले पाऊल" शाळापूर्व तयारी अभियान मेळावा यशस्वीरित्या पार पाडू शकलो. यासाठी सर्वांचे खूप खूप अभिनंदन व आभार. सदर कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि जनभागीदारी अंतर्गत राज्यातील प्रत्येक शाळेअंतर्गत असलेल्या निपुण माता गटांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनातून आपल्याला राज्यभरात १५ ऑगस्ट, २०२३ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळा स्तरावर माता गटांना एकत्र करून त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करायचे आहे. त्यांच्या गटांना सन्मानित करून त्यांच्याकडे असलेल्या "पहिले पाऊल पुस्तिका व माता गटांना जात असलेल्या आयडिया व्हिडीयो विषयी व त्यांनी मुलांच्या शिक्षणात वाढविलेला सक्रीय सहभागाबद्दल गावातील नागरिकांना माहिती देणे, जेणेकरुन प्रत्येक नागरीक आपलं प्रत्येक मूल निपूण होण्यासाठी आपला सहभाग देवू शकेल.

आपल्याला माहिती आहेच की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाला (FLN) अनन्य साधारण महत्त्व दिले असून त्याकरीता "निपूण भारत मिशन" कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील प्रत्येक मूल निपूण व्हावे, अशी आपणा सर्वांची इच्छा व महत्त्वाकांक्षा आहे.


महाराष्ट्रातील प्रत्येक मूल निपूण व्हायचे असेल तर यामध्ये शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत सर्व माता पालक खूप चांगले काम करीत आहात. परंतु, आणखी ही खूप जास्त काम करण्याची गरज आहे. जेणेकरून, शासनाने निश्चित केल्याप्रमाणे सन २०२६ - २७ पूर्वी आपण निपूण भारत अभियानाने अपेक्षतली सर्व उद्दिष्टे पूर्ण करुन घेऊ व महाराष्ट्रातील प्रत्येक मूल निपूण करण्यास हातभार लावू शकू. यामध्ये आपणा सर्वांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. याकरीता माता पालक गटाच्या कौतुक सोहळयाचे स्वरूप सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे आहे.


१) गावातील सर्व निपुण माता गटांना ( इयत्ता १ ली ते ३ री ) च्या मुलांच्या मातांचे गट सदर कार्यक्रमासाठी निमंत्रित करणे.

२) सर्व मातांना यावर्षीची वर्गनिहाय निपूण लक्ष काय आहेत याची माहिती देणे व ती प्राप्त करण्यासाठीचा कार्यक्रम आखणी करणे. 

३) सदर कार्यक्रमात प्रत्येक गटाच्या वतीने लीडर मातांना आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी देणे.

४) यापुढे देखील माता- गट सक्रीय राहण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करणे व प्रोत्साहन देणे, ज्यामध्ये आपण दिलेल्या शाळेतील "पहिले पाऊल" पुस्तिकेचा वापर 'करणे. आयडिया व्हिडीओच्या मदतीने गटातील कार्य सुरु ठेवणे. 

५) सर्वांनी मिळून निपूण शपथ घेणे.


तरी सदर कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजनपर आपल्या स्तरावर जिल्हा स्तरीय, तालुका स्तरीय व केंद्र स्तरीय बैठका आयोजित करून १५ ऑगस्ट, २०२३ रोजी कार्यक्रमात माता-गट कौतुक करण्याचे नियोजन करावे व या वर्षीची वर्गनिहाय निपुण लक्ष प्राप्तीसाठी नियोजन करावे. तरी सदर कार्यक्रमास विभागस्तर, जिल्हास्तर व सबंधित अधिकारी यांनी उपस्थित राहावे.


चला तर मग महाराष्ट्रातील प्रत्येक मूल प्रत्येक वर्षी इयत्तानिहाय "निपूण लक्ष प्राप्त करतील, अशी शपथ घेवू या. 

निपुण भारत मिशन शपथ PDF

Nipun Bharat Mission pledge PDF


निपुण शपथ PDF

www.shaleyshikshan.in                        
आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण कौशल्ये आत्मसात करण्यास उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यास कटिबद्ध आहोत.

आपण सारे मिळून, आपल्या मुलांसाठी निखळ आनंददायी समृद्ध अनुभवाच्या संधी देणारी, अभिव्यक्तीचं आकाश खुलं करणारी, मुक्त छंद जीपासणारी, नेतृत्वाच्या संधी देणारी आणि आत्मसन्मान जपणारी शाळा निर्माण करूया. आपण सारे मिळून अशी शाळा आणि घर बनवूया. जिथे बालके अर्थपूर्ण वाचन, हेतुपूरक लेखन व गणिती व्यवहार प्रत्यक्ष जीवनात उतरवतील आणि आयुष्यभर विद्यार्थी राहतील.

अशाप्रकारे, महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास आरीग्यदायी आणि आनंददायी शिक्षण देऊन 'निपुण बालक घडविण्याची आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत.



 

निपुण भारत अभियान शपथ / प्रतिज्ञा

   मी अशी शपथ घेतो की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाला (FLN) अनन्यसाधारण महत्त्व दिले असून त्याकरीता "निपूण भारत मिशन" कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासनाने निश्चित केल्याप्रमाणे सन २०२६ - २७ पूर्वी आपण निपूण भारत अभियानाने अपेक्षतली सर्व उद्दिष्टे पूर्ण करुन घेऊ व महाराष्ट्रातील प्रत्येक मूल इयत्तानिहाय "निपूण लक्ष प्राप्त करतील" यासाठी प्रत्येक मुल निपूण करण्यास हातभार लावू. जय हिंद


निपुण शपथ घेणे बाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. 

Post a Comment

0 Comments

close