Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 जाहीर... महाराष्ट्रातील श्रीम. मृणाल गांजाळे या एकमेव शिक्षिकेचा समावेश... त्यांच्या कार्याविषयी जाणून घेवूया.

शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील श्रीम. मृणाल गांजाळे यांना या वर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. 


जिल्हा परिषद शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना 5 सप्टेंबरला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळणार आहे. देशातील 50 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यामध्ये राज्यातील एका शिक्षिकेचा समावेश आहे.








दरवर्षी केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या वतीने देशातील शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. यंदा महाराष्ट्रातून सहा नामांकने केंद्र सरकारकडे पाठवण्यात आली होती त्यातून एकमेव पुरस्कार मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना जाहीर झाला असल्याचे पत्र केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सहसचिव प्राची पांडे यांनी पाठवले आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देशातील शिक्षकांना शिक्षक पुरस्काराने 5 सप्टेंबर रोजी विज्ञान भवन दिल्ली येथे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत.


शैक्षणिक अपडेट मिळण्यासाठी Telegram Channel / WhatsApp जॉईन करा. 


श्रीम. मृणाल गांजाळे यांच्या कार्याविषयी

श्रीम. मृणाल गांजाळे या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा महाळुंगे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वी राज्य शिक्षक पुरस्कार आणि आयसीटी अवॉर्डही मिळालेला आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल जिल्हा परिषद पुणे आंबेगाव तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांची संघटनांनी अभिनंदन केले आहे. उपक्रमशील, तंत्रस्नेही आदर्श शिक्षिका श्रीम. मृणाल गांजाळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले बद्दल हार्दिक अभिनंदन. 


राज्य शिक्षक पुरस्कार याविषयी जाणून घ्या. - Click Here

National ICT award विषयी माहिती जाणून घ्या. - Click Here

"प्रयोगातून विद्यार्थी घडतो. त्यामुळेच विद्यार्थ्यांना प्रयोगातून शिक्षण देण्याचा माझा प्रयत्न असतो. आपल्याला अवगत असलेल्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे, " अशा शब्दांत यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षिका मृणाल गांजाळे यांनी भावना व्यक्त केली.


Post a Comment

0 Comments

close