Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

एक राज्य, एक गणवेश - शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून एक राज्य, एक गणवेश योजनेची होणार अंमलबजावणी | एक राज्य, एक गणवेश शासन निर्णय 18 ऑक्टोबर 2023 डाउनलोड करा. | शासन शुद्धिपत्रक 24 जानेवारी 2024

मोफत गणवेश योजनेंतर्गत सर्व पात्र शाळांतील इ.१ ली ते इ.८ वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून एक समान एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरून उपलब्ध करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून एक राज्य, एक गणवेश योजनेची होणार अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 


शालेय गणवेश शुद्धिपत्रक - 24 जानेवारी 2024

18 ऑक्टोबर 2023 च्या शासन निर्णयान्वये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकसमान एक रंगाच्या दोन गणवेशांचा लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सदर शासन निर्णयामचील अनु. क्र.२ मध्ये पुढीलप्रमाणे २ (अ) समाविष्ट करण्यात येत आहे,

२ (अ): राज्यातील इ.१ ली ते इ.४ थी पर्यंतच्या मुलींकरीता पिनो फ्रॉक (Pino Frock), 
इ.५ वी ते इ.७ वी पर्यंतच्या मुलीकरिता शर्ट व स्कर्ट आणि 
इ.८ वी मधील मुलींकरीता सलवार-कमीज व ओढणी 

तसेच, इ.१ ली ते इ.७ वी पर्यंतच्या मुलांकरीता हाफ पॅट व हाफ शर्ट व 
इ.८ वी मधील मुलांकरीता फुल पॅट व हाफ शर्ट याप्रमाणे गणवेशाची रचना करण्यात यावी.

शुद्धिपत्रक - एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत शुद्धिपत्रक 24 जानेवारी 2024 - Click Here



शालेय गणवेश शासन निर्णय - 18 ऑक्टोबर 2023

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामधील इ. १ ली ते इ.८ वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. तसेच, सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांनादेखील देण्याबाबतचा शासन निर्णय दि.०६ जुलै, २०१३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.


सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटामार्फत शिलाई करुन एकसमान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्याबाबत दि.०८ जून २०२३ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे. समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत सर्व पात्र शाळांतील इ.१ ली ते इ.८ वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून एक समान एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरून उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

यापूर्वीचे शासन निर्णय

शालेय गणवेश शासन निर्णय - 08 जून 2023

शालेय गणवेश शासन निर्णय - 06 जुलै 2023



एक राज्य,एक गणवेश शासन निर्णय - 18 ऑक्टोबर 2023

१) सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकसमान एक रंगाच्या दोन गणवेशांचा लाभ महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत देण्यात यावा.

असा असेल शालेय गणवेश - शासन निर्णय पहा.


२) सदर गणवेश स्काऊट व गाईड विषयास अनुरूप (मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पँट / पँट तसेच, मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची) अशा स्वरूपात गणवेशाची रचना असावी. त्यापैकी एका गणवेशाला विद्यार्थ्याच्या शर्टवरती शोल्डर स्ट्रिप (Shoulder Strip) व दोन खिसे (Double Pocket) असणे आवश्यक आहे.

३) प्रस्तुत योजनेंतर्गत राज्यातील पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक रंग एक दर्जा असलेला सारख्याच गणवेशाचा लाभ देण्याच्या दृष्टीने कापड खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रियेचा मसुदा तयार करणे, त्यासाठी आवश्यक त्या विभागांचे मार्गदर्शन घेणे, ई-निविदा प्रक्रिया राबविणे, सर्व संबंधितांचा समन्वय राखणे याकरीता उपाययोजना करणे आदीबाबतची कार्यवाही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत करण्यात यावी.

४) सदर गणवेशाच्या शिलाईथे काम स्थानिक महिला बचत गटामार्फत करण्यासाठी महिला आि विकास महामंडळ यांच्या सहकार्याने आवश्यक ती कार्यवाही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण कार्यालयाने करावी.

५) प्रस्तुत योजनेंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शासनामार्फत समान रंगाचे दोन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने मोफत गणवेश योजन संबंधित शाळा तसेच, शाळा व्यवस्थापन समितीमार्फत स्थानिक स्तरावर कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये.

६) सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून सर्व पात्र विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळण्याच्या अनुषंगाने शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आवश्यक ती सर्व कार्यवाही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत करण्यात यावी.


प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३१०१८१८०४५७३७२१ असा आहे.

एक राज्य एक गणवेश योजना अंमलबजावणी बाबत शासन निर्णय 18 ऑक्टोबर 2023 डाऊनलोड करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close