सन 2023-24 यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची माहिती नोंदविण्यात आलेली आहे. सन २०२३-२४ U-DISE प्रणाली मध्ये Dropbox मधील विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करणेबाबत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
New update - यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये Dropbox मधील विद्यार्थी शाळांमध्ये Import करून घेणेबाबत...
दि. २८ जून, २०२४ रोजीच्या यु-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार राज्यामध्ये २३,४७,३८६ एवढे विद्यार्थी Dropbox मधुन शाळांमध्ये Import करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. यावर्षी यु-डायस प्लसमध्ये कोणत्याही शाळेस इयत्ता २री ते इयत्ता १२वी पर्यंतच्या वर्गामध्ये New Entry करता येणार नाही. विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पध्दतीने माहिती Transfer करून दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश नोंदविता येईल.
शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळामध्ये विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश दिले असल्यास त्या विद्यार्थ्यांना नव्याने Entry न करता Dropbox मधुन विद्यार्थ्यांची माहिती त्वरीत Import करणे आवश्यक आहे. तरी प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या Dropbox मधील Active for Import Status असलेले विद्यार्थी तात्काळ Import करण्याच्या सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात, जेणेकरून Dropbox मधील विद्यार्थ्यांची संख्या शुन्य करता येईल.
विद्यार्थी Import करणेबाबत परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
Udise Plus Update - 28 February 2024
Usise plus update - 24 January 2024
Udise Plus 2023-24 Login
UDISE Main Profile and facilities - Click Here
UDISE Teacher Module link - Click Here
UDISE Student Module link - Click Here
UDISE Report Module link - Click Here
Join WhatsApp Group -शालेय शिक्षण Online Information
Udise plus update -28 December 2023
Udise Plus 2023-24 Login
UDISE Main Profile and facilities - Click Here
UDISE Teacher Module link - Click Here
UDISE Student Module link - Click Here
UDISE Report Module link - Click Here
Join WhatsApp Group -शालेय शिक्षण Online Information
https://chat.whatsapp.com/LZI6EHHFcAoE7k3sa7QaZf
राज्यातील मान्यता प्राप्त सर्व शाळांची माहिती दि. ३१ ऑक्टोबर, २०२३ रोजी पर्यंत भरून अंतिम करण्याकरिता कळविण्यात आले आहे परंतू दि. २२ ऑक्टोबर, २०२३ रोजीच्या यु-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार ८८.०८% शाळांची भौतिक माहिती अद्ययावत केलेली आहे, ७६.२७% शाळांमधील शिक्षकांची माहिती अंतिम केलेली आहे, ७१.७०% विद्यार्थ्यांची माहिती अंतिम केलेली आहे. २५,७८८ शाळांनी शिक्षकांची अद्यापपर्यंत माहीती भरण्याकरिता सुरुवातही केली नाही, तर १२,९४७ शाळांनी भौतिक माहिती भरणेकरिता चालढकल करित असल्याकारणाने माहिती पूर्ण न झाल्यामुळे राज्य व केंद्र शासनास सन २०२४-२५ व सन २०२५-२६ समग्र शिक्षा, स्टार्स व PM Shri योजनांचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक सादर करण्यासाठी विलंब होत आहे.
याबाबत आपणास कळविण्यात येते की, जिल्ह्यातील शासकीय व अनुदानित शाळांना दि. ३० नोव्हेंबर, २०२३ पर्यंत यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती अंतिम करण्याकरिता कळविण्यात यावे. शाळांनी माहिती अद्ययावत न केल्यास सदर शाळांमधील शिक्षकांचे वेतन अदा करण्यात येवू नये.
जिल्हा व तालुका स्तरावरून वेतन पथकांनी सदर शाळांकडून यु- डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांची सर्व माहिती अद्ययावत केल्याचे मुख्याध्यापक यांचेकडून प्रमाणित करून घ्यावे, त्यानंतरच वेतन अदा करण्यासाठी आदेशित करावे. माहिती अद्ययावत न झाल्यास सदर शाळेमधील विद्यार्थी शासनाकडून देण्यात येणाऱ्या लाभापासून (उदा. मोफत गणवेश, पाठयपुस्तके, शैक्षणिक सोयी-सुविधा, स्कॉलरशिप इ.) वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माहिती भरतांना तांत्रिक अडचण येत असल्यास तालुका, जिल्हा व राज्य स्तरावरील टेक्नोसेव्ही शिक्षक, एम.आय.एस. कोऑर्डीनेटर व संगणक प्रोग्रामर यांचेशी संपर्क करण्यात यावा.
0 Comments