Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) या संवर्गातील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर सरळसेवेने रूजू झालेल्या अधिकाऱ्यांना नियमित पदस्थापना

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) या संवर्गातील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर सरळसेवेने (एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम ७ द्वारे) रूजू झालेल्या अधिकाऱ्यांना नियमित पदस्थापना देण्यात आली आहे. 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा (मुख्य) परीक्षा २०१९ च्या आधारे शिफारस केलेल्या व एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम ७ अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या उपशिक्षणाधिकारी व तत्सम, गट-ब या संवर्गातील उमेदवारांकरिता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिपत्त्याखालील आस्थापनेवर संदर्भाधीन क्रमांक ४ व ५ च्या शासन निर्णयान्वये दिनांक १७/०१/२०२२ पासून दोन वर्षाच्या कालावधीकरिता (सहाव्या वेतन आयोगानुसार) एस.१७ रू. ४७६००-१५११०० या वेतनश्रेणीत अधिसंख्य पदे निर्माण करण्यात आली आहेत.

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम ७ अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या १८ उमेदवारांसाठी संदर्भ ४ व ५ व्या शासन निर्णयाद्वारे १८ अधिसंख्य पदे निर्माण करण्यात आली आहेत. त्यापैकी १८ अधिकाऱ्यापैकी श्री. माधव कांबळे यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तसेच, श्री. विजय कावळे आणि श्रीम. वर्षा कोळेकर हे या पदावरुन कार्यमुक्त करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या उक्त पत्रान्वये कळविले आहे. सबब, त्यांची नांवे पदस्थापनेतून वगळण्यात आली आहेत. इतर १५ अधिकाऱ्यांना नियमित पदस्थापना देणे आवश्यक असल्याने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.


शासन आदेश :-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा (मुख्य) परीक्षा- २०१९ च्या निकालाच्या आधारे शिफारस केलेल्या व एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम ७ अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या उपशिक्षणाधिकारी व तत्सम, गट-ब या संवर्गातील सध्या कार्यरत असलेल्या खालील १५ परिविक्षाधीन उप शिक्षणाधिकारी यांना त्यांच्या नावासमोर दर्शविण्यात आलेल्या स्तंभ क्रमांक ५ मध्ये दर्शविलेल्या ठिकाणी पदस्थापना देण्यात येत आहे.





उक्त नमूद उपशिक्षणाधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबतची कार्यवाही सामान्य प्रशासन विभाग / कार्यासन-सीपीटीपी ब कडून होणार असून, त्याबाबतचे आदेश यथावकाश निर्गमित करण्यात येतील.

आयुक्त (शिक्षण), पुणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांस पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याकरीता तात्काळ कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करावी. तसेच संबंधित अधिकारी यांनी पदस्थापनेचा आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसाच्या आत पदस्थापनेच्या पदावर रुजू व्हावे व संबंधित अधिकारी रुजू झाल्याचा दिनांक आयुक्त (शिक्षण) यांनी शासनास कळवावा.

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२४०४२६१५३५५२९४२१ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहेत.


सन 2024 सालातील शासन निर्णय - शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन- Click Here

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रके - Click Here

Post a Comment

0 Comments

close