Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शालेय पोषण आहार ऑनलाईन माहिती न भरलेल्या शाळांना पोषण आहार अनुदान ऑफलाईन मिळणार

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांच्या ऑफलाईन देयकांच्या माहिती बाबत... शालेय पोषण आहार दररोजची ऑनलाईन माहिती न भरलेल्या शाळांना पोषण आहाराचे अनुदान ऑफलाईन देण्यात येणार आहे. परिपत्रक पहा.




प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. सदर लाभाची दैनंदिन माहिती राज्यामधील प्रत्येक जिल्हयातील शाळांनी शासनाने सरल प्रणालीअंतर्गत विकसित केलेल्या एम.डी. एम पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. तथापि अनेक शाळांना विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणामुळे विहित वेळेत दैनंदिन उपस्थितीची माहिती भरता आलेली नसल्यामुळे अशा शाळांना एमडीएम पोर्टलमार्फत जनरेट करण्यात आलेल्या ऑनलाईन देयकांचा लाभ मिळालेला नाही.

त्यानुषंगाने सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना निर्देशित करण्यात येते की, सदर योजनेंतर्गत काही शाळांनी विहित वेळेत ऑनलाईन माहिती भरलेली नसल्यामुळे, अशा शाळांनी आहार शिजवून देखील संबंधित शाळांना अनुदान मिळालेले नाही, अशा शाळांची माहिती खालील विहित नमुन्यामध्ये संचानालयास दि. २८.०४.२०२४ पर्यंत विनाविलंब सादर करण्यात यावी. सदर माहिती सादर करतांना प्रस्तुत संस्थांना देय रक्कम नियमानुसार देय असलेबाबतचे प्रमाणपत्र व कोणत्याही देयकाची दुबार अदायगी होत नसलेबाबतचे प्रमाणपत्र देखील सोबत सादर करण्यात यावे. सदर बाबत विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी.

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांच्या ऑफलाईन देयकांच्या माहिती सादर करणेबाबत परिपत्रक - Download

Post a Comment

0 Comments

close