Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ करणेबाबत कार्यपद्धती

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ करणेबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार इयत्ता १ ते ४ थी च्या शाळांना ५ वी चा वर्ग व आवश्यकता असल्यास उच्च प्राथमिक व माध्यमिक वर्ग जोडण्यास तसेच इयत्ता १ ली ते ७ वी च्या वर्गांन ८ वी चा वर्ग व आवश्यकता असल्यास माध्यमिकचे वर्ग जोडण्यात येणार आहेत. 


बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण वैधानिक जबाबदारी राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इयत्ता १ ते ४ थी च्या शाळांना ५ वी चा वर्ग व आवश्यकता असल्यास उच्च प्राथमिक व माध्यमिक वर्ग जोडण्यास तसेच इयत्ता १ ली ते ७ वी च्या वर्गांना ८ वी चा वर्ग व आवश्यकता असल्यास माध्यमिकचे वर्ग जोडण्यास शासन निर्णय दि.१५/३/२०२४ प्रमाणे कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.


शासन निर्णय 15 मार्च नुसार शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ करणेबाबत क्षेत्रिय स्तरावर खालील प्रमाणे कार्यवाही करावी.




करावयाची कार्यवाही व लागणारा कालावधी

1- प्राथमिक शाळांचे दर्जावाढ करणे यासाठी आवश्यक असणाऱ्या शाळा निश्चित करणे. (2मे ते 15 मेपर्यंत) 

2- गटशिक्षणाधिकारी/वॉर्ड ऑफिसर यांनी आवश्यक बाबींची पडताळणी करून प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परषिद / प्रशासन अधिकारी यांचेकडे दाखल करणे. (16 मे ते 22 मे) 

3- प्रस्तावाची पडताळणी करून मंजूर पायाभूत पदे, आवश्यक भौतिक सुविधा यांचा आढावा घेऊन प्रस्ताव शासन निर्णय दि.१५/३/२०२४ नुसार सक्षम प्राधिका-याकडे मान्यतेस सादर करणे. (23 मे ते 31 मे पर्यंत) 

4- सक्षम प्राधिकारी यांनी प्राप्त प्रस्तावांची पडताळणी करून प्रस्तावावर निर्णय घेणे. (1 जून ते 7 जून) 

5- प्राथमिक शाळांचे दर्जावाढ केलेल्या शाळांमध्ये आवश्यक ती पूर्व तयारी करणे (शिक्षक/भौतिक सुविधा) (8 जून ते 14 जून) 

6- प्राथमिक शाळांची दर्जावाढ केलेली वर्ग प्रथम सुरू करणे. 15 जून

7- प्राथमिक पायाभूत मंजूर पदांमधून माध्यमिक पदांमध्ये उच्चीकरण करावयाचे असल्यास प्रस्ताव शिक्षण उपसंचालक यांचेमार्फत संचालनालयास सादर करणे. (15 जून ते 30 जून) 


तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा शासन निर्णय क्रमांक एसएसएन-२०१५/(प्र.क्र.१६/१५) टीएनटी-२/दि.१५/३/२०२४ मधील मुद्दा क्र.७ मधील खालील बाबी विचारात घेण्यात याव्यात.

वर्ग जोडणेबाबत 15 मार्च चा शासन निर्णय - Click Here


७.३ - बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २००९ मधील भाग तीन कलम ४ (६) नुसार (क) इयत्त पहिली ते पाचवी यामध्ये शिकणा-या बालकांबात वस्ती नजीकच्या एक किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत व ६ ते ११ वर्ष वयोगटातील किमान २० बालके उपलब्ध असेल तेथे शाळा स्थापन केली जाईल.


७.४-इयत्ता सहावी ते आठवी यामध्ये शिकणा-या बालकांबाबत, वस्तीनजीकच्या तीन किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत व इयत्ता ५ वी मध्ये किमान २० बालके उपलब्ध असतील तेथे शाळा स्थापन केली जाईल.


उपरोक्त शासन निर्णयानुसार कार्यवाही करताना खालील बाबीची प्रामुख्याने दक्षता घेण्यात यावी.

१- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा दर्जावाढ करताना आपल्या जिल्ह्यातील पायाभूत पदांच्या मर्यादेतच वाढीव पदे निर्माण करावीत.

२- प्राथमिकची पायाभूत पदे शिल्लक असताना त्या पदांच्या मर्यादेत माध्यमिक पदांची आवश्यकता असल्यास अशा पदांसाठी शासनाची मान्यता घेणे आवश्यक आहे.

३-प्राथमिक शाळांचा दर्जावाढ करताना आपल्या जिल्हयातील पायाभूत पदांच्या मर्यादेत दर्जावाढीचे अधिकचे प्रस्ताव प्राप्त झाले असल्यास (उदा. पायाभूत पदांमध्ये २० पदे शिल्लक आहेत व मागणी ३० पदांसाठी असेल) अशा परिस्थितीत दर्जावाढ देताना शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना लांबच्या अंतरावर जावे लागत असल्यास अशा मूळ शाळेस दर्जावाढ देण्याचा प्राधान्यक्रम ठरवावा. 

तरी उपरोक्त प्रमाणे विहित कालावधीमध्ये आवश्यक कार्यवाही होईल याची दक्षता घेण्यात यावी.

शासन निर्णय 15 मार्च नुसार शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ करणेबाबत कार्यपद्धती विहित करणेबाबत परिपत्रक 19 एप्रिल 2024 - Download

Post a Comment

0 Comments

close