जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत Extra Increment
Regarding giving an advance increment to graduate primary teachers after promotion to the post of Principal or Center Head
दिनांक :- १४.०५.२०२४
स्मरणपत्र - १
प्रति,
महोदय,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, (सर्व)
(पालघर, रत्नागिरी, गडचिरोली, अहमदनगर, कोल्हापूर व सोलापूर वगळून)
विषय :- जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत.
संदर्भ :- शासनाचे समक्रमांक दि.२०.०३.२०२४ चे पत्र
उपरोक्त विषयांकीत प्रकरणी संदर्भाधीन पत्रान्वये मागविलेली आपल्या कार्यालयाची माहिती अद्याप अप्राप्त आहे. तरी सदरहू माहिती संदर्भाधीन पत्रात नमूद केलेल्या विहीत विवरणपत्रामध्ये तात्काळ शासनास सादर करावी, ही विनंती.
आपली,
(दिपाली पवार)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
0 Comments