Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

MHT CET 2024 Answer Key एमएचटी-सीईटी 2024 उत्तरतालिका जाहीर.

MHT CET 2024 Answer Key एमएचटी-सीईटी 2024 उत्तरतालिका जाहीर. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी शिक्षणासह इतर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी- सीईटी) निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार आहे. या निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली. परीक्षेची उत्तर तालिका (अन्सर की) व सोडविलेली प्रश्नपत्रिका लॉगिन आयडीवर प्रसिद्ध केली आहे.


राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ करिता अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी पीसीबी ग्रुपची सीईटी परीक्षा २२ ते ३० एप्रिल, तर पीसीएम ग्रुपची परीक्षा २ ते १६ मे या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी ७ लाख २५ हजार ९३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ लाख ७५ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. या विद्यार्थ्यांमध्ये ३ लाख ७९ हजार ८६८ विद्यार्थ्यांनी पीसीएम या गटातून, तर पीसीबी या गटातून ३ लाख १४ हजार ७६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याचे नियोजन असल्याची माहिती आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली.


या परीक्षेची उत्तर तालिका आणि उमेदवारांनी सोडलेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या लॉगिन आयडीवर प्रसिद्ध केली आहे.

पीसीबी ग्रुपच्या विद्यार्थ्यांना २४ मेपर्यंत आक्षेप नोंदवता येईल. तर, पीसीएम ग्रुपच्या विद्यार्थ्यांना २६ मे पर्यंत आक्षेप नोंदवता येईल.


महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने MHT CET 2024 परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली आहे. आन्सर की व्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी रिस्पॉन्स शीट देखील जारी केली आहे.

राज्य सीईटी कक्षाने MHT CET प्रोव्हिजनल आन्सर की वर काही हरकत असेल तर ती नोंदवण्यासाठी देखील मुदत दिली आहे. उमेदवार २४ मे / २६ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत आपले आक्षेप नोंदवू शकतात. आन्सर की वर हरकत नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक हरकतीसाठी एक हजार रुपये याप्रमाणे शुल्क भरावे लागेल. यानंतर अंतिम उत्तर तालिका २८ मे रोजी जारी केली जाईल.


MHT CET 2024 Answer Key अशी करा डाऊनलोड

how to download mht cet answer key 2024? 


Step 1 – Go to the official website, cetcell.mahacet.org. 
Step 2 – Click on the download link for MHT CET Answer Key 2024 on the homepage. 
Step 3 – You will be directed to a new page, click on the answer key download link. 
Step 4 – Enter your email ID and password.

- सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ mhtcet2024.mahaonline.gov.in वर जा.
- यानंतर विचारलेली सर्व माहिती भरा.
- आता MHT CET आन्सर की च्या लिंक वर क्लिक करा.
- आता सर्व माहिती सबमीट करून आन्सर की डाऊनलोड करा.

mht cet answer key 2024 pcm release date - Click Here

mht cet pcb result date 2024 - Click Here

mht cet pcm result date 2024 - Click Here

महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) उत्तरसूची





MHT CET Answer Key वर हरकत कशी नोंदवायची?.. 
- सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ https://cetcell.mahacet.org/ वर जा.
- आता आपल्या पासवर्ड आणि आयडीच्या मदतीने लॉग इन करा.
- यानंतर प्रोसीट बटण क्लिक करा.
- यानंतर ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक करा.
- आता सर्व माहिती भरून सबमीट करा.

MHT-CET चा निकाल कधी? 
सीईटी कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, एमएचटी सीईटीचा निकाल (MHT-CET Result) जून पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. यावर्षी सुमारे ४.३५ लाख उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

Post a Comment

0 Comments

close