वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2025-26 नोंदणी होणार ऑनलाईन पध्दतीने, ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यासाठी मागविल्या निविदा मागविण्यात आल्या होत्या. या प्रशिक्षणाची नावनोंदणी ऑनलाईन पद्धतीने maa.ac.in या वेबसाइटवर होणार आहे. www.shaleyshikshan.in
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2025-26 हे ऑफलाईन पद्धतीने होणार असून सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचेमार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहे.
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 2025-26 नावनोंदणी
https://www.maa.ac.in/index.php?tcf=training
ईमेलID व मोबाईल क्रमांक अपडेट करण्यासाठी शालार्थ, सेवार्थ, BMC पोर्टल लिंक - Click Here
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील पूर्ण वेळ शिक्षक यांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत नियोजन सुरू आहे.
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता पोर्टल विकसित करण्यात येत आहे. सेवार्थ प्रणालीमधील अद्ययावत माहिती सदर पोर्टलसाठी आवश्यक असल्याने आदिवासी विकास विभागाच्या शाळेतील शिक्षकांची सोबतच्या विहित नमुन्यातील रिअल टाईम माहितीचा सेवार्थ प्रणाली API सेवापूर्व विभागाच्या preserviceedudept@maa.ac.in या email Id वर लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. ही विनंती
प्रशिक्षणार्थीना / शिक्षकांना माहिती नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यात पोर्टल विकसित करणे.
प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन (payment gateway) जमा करून पावती देणे. व सर्व व्यवहारांचे विहित नमुन्यात अहवाल देणे
नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीना SMS किवा E- MAIL द्वारे CONFIRMATION देणे. याविषयीची विहित प्रक्रिया करणे,
प्रशिक्षणार्थीना नोंदणी क्रमांक विकसन (password मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून देणे.)
जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांना Login ID देणे, व सूचनेप्रमाणे माहिती उपलब्ध करून देणे तसेच प्रशासकीय पद्धती राबवणे उदा. हजेरीचा फोटो अपलोड करणे इ.
जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (36 DIET) यांना नोंदणी (शिक्षक माहिती, बॅच, गट, प्रशिक्षण प्रकार शुल्क परतावा इ.) मध्ये दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देणे.
निवडलेल्या प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षणादरम्यान आवश्यक मार्गदर्शक सूचना व जिल्हानिहाय जिल्हासमन्वयकांची नावे व संपर्क क्रमांक विहित नमुन्यात प्रसिद्ध करणे.
प्रशिक्षणाची Progress ची Day to Day माहिती उपलब्ध होणे. उदा. हजेरी, सुलभक । प्रशिक्षणार्थी online survey (feedback) इ. तज्ञ प्रशिक्षकांची मार्गदर्शकांची ऑनलाइन नोंदणी करणे. (दैनिक भत्ता मानधन, प्रवास भत्ता इ.)
१० प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर जिल्हा स्तरावर online पद्धतीने अटी शर्तीना अधीन राहून प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे. (उदा. एकही सेशन गैरहजर असेल तर प्रमाणपत्र तयार होऊ नये इ.)
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन पोर्टल विकसित करणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2024-25 ऑफलाईन पध्दतीने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
वरिष्ट वेतनश्रेणी प्रशिक्षण पात्रता निकष - Click Here
निवडश्रेणी प्रशिक्षण पात्रता निकष - Click Here
संदर्भ: १) शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.४३/प्रशिक्षण दि.२३/१०/२०१७. २) शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.४३/प्रशिक्षण दि.२०/०७/२०२१.
३) महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी (डायट) संघटना यांचे दि.२१/०२/२०२४ चे निवेदन
४) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) जळगांव यांचे पत्र क्र. जिशिप्रसं/जळगाव/ व.नि.श्रेणी प्र./२०२३-२४/६६,दि.२३/०२/२०२४.
५) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) धुळे यांचे पत्र क्र. जिशिवप्रसंधु/ववेनिश्रेप/२०८, दि.२३/०२/२०२४.
६) विभागीय शिक्षण उपसंचालक, अमरावती यांचे पत्र क.जा.क्र.जिशिपर्स/अम/ ववेश्रेवनिश्रे प्रशिक्षण/१५३/२४, दि.०१/०३/२०२४.
उपरोक्त विषयानुसार संदर्भ क्र.२ अन्यये वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाकडून परिषदेस सोपविण्यात आली आहे. संदर्भ क्र.२ नुसार किमान १० दिवसांचे किंवा ५० घड्याळघ तासांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक करण्यात आले. यापूवी कॉविड १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीमुळे सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आले होते. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने घेणेबाबत संदर्भ पत्र क्र.३ अन्वये महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारो (डायट) संघटना यांचेकडून तसेच संदर्भ पत्र क्र.४ ते ६ अन्वये वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने घेणेबाबत क्षेत्रिय कार्यालयांकडून विनंती करण्यात आली आहे.
प्रत्यक्ष वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण प्रभावीपणे दिले जाऊन, प्रशिक्षणांतर्गत तज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणार्थींचे परस्परांमधील संभाषणात्मक शैलीतून अनुभव व विचारांची देवाण-घेवाण सहजगत्या व्हावी तसेच सदर प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा उपयोग शैक्षणिक सेवेत होऊन शिक्षक अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन सन २०२४-२५ पासून ऑफलाईन पध्दतीने जिल्हास्तरावर (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमध्ये) घेण्याचे नियोजित आहे. यार्कारता सर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी ५ तज्ञ अभ्यासक/तज्ञ मार्गदर्शक यांची नावे परिषदेस दि.५ जून २०२४ पर्यंत preservicedept@maa.ac.in या ई-मेल आयडीवर सादर करावी. यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता/अधिव्याख्याता इत्यादी ३ तसेच याव्यतिरिक्त आपल्या जिल्ह्यातील इतर २ तज्ज्ञ मार्गदर्शकांचे नावांचा समावेश असावा.
2 Comments
वरीष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण केव्हा होणार?
ReplyDeleteप्रशिक्षणा ची अंदाजे तारीख कोणती असेल
Delete