शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा | राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अंशतः/पूर्णतः अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस मान्यता देण्याबाबत शासन निर्णय 11 ऑगस्ट 2026 जाहीर | शिक्षकेतर कर्मचारी वैयक्तिक मान्यता बाबत परिपत्रक 10 सप्टेंबर 2026
संचमान्यता बाबत अपडेट - Click Here
संचमान्यता सुधारित निकष - 15.03.2024 शासन निर्णय - Click Here
नॉन टिचिंग शिक्षकेतर कर्मचारी वैयक्तीक मान्यता पोर्टलबाबत 10 सप्टेंबर 2026
मान्यताप्राप्त खाजगी अंशतः/पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक ही शिक्षकेत्तर पदे भरणेबाबत शासनाने शासन निर्णय दि.११.०८.२०२६ अन्वये शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना मान्यता देण्यात आली आहे.
सदर प्रकरणी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तीक मान्यता देणेकामी ऑनलाईल पोर्टल तयार करणेबाबत मा. आयुक्त (शिक्षण) म.रा पुणे यांचे निर्देश आहेत.
संचालनालयाचे पत्र दि.२८.०५.२०२५ पूर्वी पदभरती झालेल्या शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचारी यांची माहिती वैयक्तीक मान्यता पोर्टलव्दारे भरुन सादर करण्याचे निर्देश संबंधित संस्थाना/शाळांना क्षेत्रीय स्तरावरुन देण्यात आलेले आहेत.
राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अंशतः/पूर्णतः अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस मान्यता देण्याबाबत शासन निर्णय - 11 ऑगस्ट 2026
दि. ०४.०४.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः / पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचारी संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के रिक्त पदे विहित कार्यपध्दतीचा अवलंब करुन भरण्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती. तथापि, संदर्भ क्र. ९ येथील शिक्षण संचालक माध्यमिक) व उच्च माध्यमिक यांच्या दि. २८.०५.२०२५ च्या पत्रान्वये शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीसाठी स्थगिती देण्यात आली होती. सदर स्थगिती रद्द करुन शिक्षकेत्तर पदभरतीबाबत नव्याने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
शिक्षकेतर कर्मचारी भरती शासन निर्णय 11 ऑगस्ट 2026
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः / पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील खालील संवर्गातील शिक्षकेत्तर पदे सरळसेवेने भरण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
१. कनिष्ठ लिपीक
२. पूर्णवेळ ग्रंथपाल
३. प्रयोगशाळा सहाय्यक
३. उपरोक्त मान्यता खालील अटींच्या अधिन राहून प्रदान करण्यात येत आहे:-
अ) संस्था व्यवस्थापनाने सरळसेवेने पदभरतीस मान्यता मिळण्यासंदर्भात करावयाची कार्यवाही :-
१) दि. ०७.०३.२०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित केल्याप्रमाणे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठीच्या सुधारित आकृतिबंधाच्या अनुषंगाने व्यपगत होणारी पदे, अतिरिक्त ठरणारी पदे, समावेशनाच्या अटी व शर्ती इत्यादीबाबत कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे याची खातरजमा करण्यात यावी.
२) वरीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आल्यानंतर संचमान्यतेनुसार त्या-त्या संवर्गाची मंजूर पदे, कार्यरत पदे व रिक्त पदे यांची संख्या निश्चित करण्यात यावी.
३) रिक्त पदे भरण्यासाठी प्रथमतः पदोन्नतीचा मार्ग अवलंबविण्यात यावा. यासाठी नियमित नियुक्तीने कार्यरत पात्र चतुर्थश्रेणी कर्मचारी उपलब्ध असल्यास त्यास पदोन्नती देण्याची कार्यवाही करण्यात यावी.
४) रिक्त पदे भरण्यासाठी पदोन्नतीच्या मार्गाने पात्र उमेदवार उपलब्ध झाला नाही तसेच उपलब्ध होऊन त्यास पदोन्नती देण्यात आल्यानंतरही पदे शिल्लक राहत असल्यास अनुकंपा नियुक्तीच्या मार्गाचा अवलंब करण्यात यावा. यासाठी संदर्भ क्र. १० व ११ येथील शासन निर्णय व शासन परिपत्रकातील तरतुदींचे अवलोकन करण्यात यावे.
५) पदोन्नती व अनुकंपा नियुक्ती या मार्गाचा अवलंब केल्यानंतरही कनिष्ठ लिपीक, पूर्णवेळ ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गातील पदे रिक्त राहत असल्यास संचमान्यतेनुसार निश्चित झालेल्या एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के पदे सरळसेवेने भरता येतील.
६) त्या-त्या संवर्गाची बिंदू नामावली मागासवर्ग कक्षाकडून तपासून घ्यावी. अद्यावत बिंदूनामावलीच्या प्रमाणित प्रतीसह व जाहिरातीच्या प्रारुपासह शिक्षकेत्तर पदभरतीबाबतचा प्रस्ताव प्रकरणपरत्वे संबंधित शिक्षणाधिकारी / विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करण्यात यावा. जाहिरातीच्या प्रारुपात त्या-त्या संवर्गातील उमेदवाराची अर्हता संदर्भ क्र. १२ येथील शासन अधिसूचनेतील अर्हतेनुसार नमूद करण्यात आली आहे, याची खातरजमा करावी.
ब) संबंधित शिक्षणाधिकारी / विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी करावयाची कार्यवाही :-
१) बिंदूनामावलीच्या प्रमाणित प्रतीसह व जाहिरातीच्या प्रारुपासह शिक्षकेत्तर पदभरतीचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर प्रथमतः संदर्भ क्र. ३ येथील दि. ०७.०३.२०१९ रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही झाली असल्याची खात्री करावी.
२) उपरोक्त (अ) येथे नमूद इतर सर्व बाबींची पूर्तता झाली आहे व चालू संचमान्यतेनुसार रिक्त पदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे याची खात्री करण्यात यावी. यासाठी संस्था व्यवस्थापनाकडून आवश्यकतेनुसार शपथपत्र घेण्यात यावे. त्याचप्रमाणे अनुकंपा नियुक्तीसाठी पहिल्या व दुसऱ्या प्रतिक्षा सूचीत पात्र उमेदवार उपलब्ध नाहीत याची शिक्षणाधिकारी (योजना) यांच्याकडून माहिती घ्यावी.
३) जाहिरातीचे प्रारुप काटेकोरपणे तपासून सदर जाहिरात सर्वाधिक खपाच्या प्रत्येकी १ स्थानिक व राज्यस्तरीय वृत्तपत्रात प्रसिध्द करणे आवश्यक असल्याची सूचना देण्यात यावी. यासाठी संदर्भ क्र. ५ येथील शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट-ब अन्वये निश्चित करण्यात आलेली वृत्तपत्रे विचारात घेणे आवश्यक राहील. त्याचप्रमाणे संबंधित संस्थांच्या संकेतस्थळावर तसेच शाळांच्या सूचना फलकावर सदर जाहिरात प्रसिध्द करणे व अन्य शक्य असलेल्या मार्गाचा अवलंब करुन अधिकाधिक प्रसिध्दी मिळेल अशा पध्दतीने कार्यवाही करणे आवश्यक असल्याची सूचना देखील देण्यात यावी. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविणे, छाननी, मुलाखत व त्याआधारे अंतिम निवड यादी तयार करणे इत्यांदीसाठी किमान ३ महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे, याची खात्री करावी. असा वेळ देण्यात आला नसल्यास आवश्यक ती सुधारणा जाहिरातीच्या प्रारुपात करण्याची सूचना करण्यात यावी.
४) जाहिरातीच्या प्रारुपात कमाल वयोमर्यादा खुला प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागासवर्गीयासाठी ४३ वर्षे अशी तरतुद संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयासोबतच्या प्रपत्र-क अन्वये करण्यात आली आहे. त्यानुसार जाहिरातीच्या प्रारुपात अशी तरतुद करण्यात आली आहे किंवा कसे, याची खात्री करावी.
५) शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुरुवातीचा तीन वर्षांचा कालावधी मानधनावरील नियुक्तीचा असेल याचा स्पष्ट उल्लेख जाहिरातीच्या प्रारुपात आहे किंवा कसे, याची खातरजमा करावी.
६) प्रमाणित बिंदुनामावलीनुसार भरावयाची पदे जाहिरातीच्या प्रारुपात त्या-त्या सामाजिक प्रवर्गासाठी दर्शविण्यात आली आहेत, याची खातरजमा करावी. त्याचप्रमाणे समांतर आरक्षण योग्य प्रकारे दर्शविण्यात आले आहे, याची खातरजमा करावी.
७) सर्व आवश्यक बाबींची पूर्तता होत असल्यास रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेत सरळसेवा पदभरतीस परवानगी देण्यात यावी.
क) सरळसेवेने पदभरतीस मान्यता मिळाल्यानंतर संस्था व्यवस्थापनाने करावयाची कार्यवाही :-
१) प्रकरणपरत्वे संबंधित शिक्षणाधिकारी / विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी ज्या अटी व शर्तीच्या आधारे पदभरतीस मान्यता दिली आहे, त्या अटी व शर्तीची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल याची दक्षता घेण्यात यावी.
२) जाहिरातीत नमूद केल्यानुसार अर्ज मागविणे, छाननी, मुलाखतीचे आयोजन, अंतिम निवड यादी तयार करणे इत्यादीबाबत निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसारच कार्यवाही होणे आवश्यक आहे.
३) मुलाखत प्रक्रियेचे इन-कॅमेरा चित्रीकरण संस्थेने स्वखर्चाने करुन त्याबाबतचा अभिलेख जतन करणे आवश्यक राहील.
४) विहित मार्गाने निवड झालेल्या उमेदवारास नियुक्ती आदेश देण्यात यावेत.
५) नियुक्तीस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी/विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे सादर करण्यात यावा.
ड) नियुक्तीस मान्यता देण्याबाबत शिक्षणाधिकारी/विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी करावयाची कार्यवाही :-
ज्या अटी व शर्तीच्या आधारे पदभरतीस मान्यता देण्यात आली होती, त्या सर्व अटींची पूर्तता झाली आहे तसेच प्रस्तुत शासन निर्णयात नमूद केलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे, याची खातरजमा करुन नियुक्तीस मान्यता देण्याबाबत कार्यवाही करावी.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०८१११८११२५४७४९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
सन 2024-25 संचमान्यतेनुसार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन करणेबाबत शासन परिपत्रक 28/05/2025
संचालनालयाचे संदर्भ क्र.४ च्या पत्रान्वये सन २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार मंजूर व रिक्त, अतिरिक्त बाबत पदांची माहिती संचमान्यता प्रणालीच्या वेबसाईटवरील उपलब्ध माहितीनुसार वर्ग-३ च्या शिक्षकेत्तर संवर्गातील १३०१ ( अधीक्षक या संवर्गातील ०४ पदे वगळून) अतिरिक्त शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अन्यत्र रिक्त असणाऱ्या शाळांमधील पदावर समायोजन करण्याची कार्यवाही करावी तसेच समायोजन करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय पदभरतीबाबत निर्णय घेता येत नसल्याने समायोजनाची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी.
सन 2024-25 संचमान्यतेनुसार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन करणेबाबत शासन परिपत्रक 18 नोव्हेंबर 2025 👇
शासन पत्र दि.28.06.2024 अन्वये प्राप्त निर्देशानुसार दि.30.09.2023 रोजी नोंद असलेल्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेवून दि.28.01.2019 च्या सुधारित आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पदांच्या मर्यादेत व जिल्हानिहाय अनुज्ञेय होणाऱ्या पदांच्या मर्यादेत संस्थांना पदे अनुज्ञेय करुन सन 2023-24 च्या शिक्षकेतर कर्मचा-यांची संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
संचमान्यता पोर्टल लॉगीन - Click Here
Sanch Manyata Portal Login - Click Here
Sanch Manyata login 2024-25
सदर संच मान्यता दि.28.01.2019 च्या सुधारित आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पदांच्या मर्यादेत व जिल्हानिहाय अनुज्ञेय होणाऱ्या पदांची पडताळणी जादा पदे मंजूर होत असलेल्या करुन निर्गमित कराव्यात. शासन निर्णय दि.२८.०१.२०१९ च्या आकृतीबंधानुसार शिक्षकेतर पदांची संच मान्यता दि.३०.०९.२०२३ रोजी नोंदलेली व संच मान्यता निर्गमित केल्याच्या दिनांकाअखेर - आधार वैध विद्याथी संख्येच्या आधारे निर्गमित करतांना अनुज्ञेय होणारी पदे मूळ पायाभूत पदांपेक्षा अधिक होत असेल तर अशा पदांच्या मंजूरीची कार्यवाही शासनाच्या पूर्व परवानगीने करावी. शासन निर्णय क्र. एसएसएन-२०१५/प्र.क्र.१२/टीएनटी-२, दि.०७.०३.२०१९ च्या प्रपत्र व मधील कार्यपध्दती अटी व शर्तीनुसार रिक्त पदे प्रथम समायोजनाने भरण्याची कार्यवाही करावी. समायोजन पूर्ण झाल्याशिवाय अशी मंजूर व अनुज्ञेय पदे भरता येणार नाहीत.
सन २०२३-२४ च्या शिक्षकेतर संच मान्यता दि.३०.०९.२०२३ रोजीच्या पटावरील अनुदानित व अशंतः अनुदानित आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आली असून सदरची अनुज्ञेय पदे पूर्वलक्षी प्रभावाने देय ठरणार नाही. याची नोंद घ्यावी.
0 Comments