Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

chhava movie download link | छावा चित्रपट डाउनलोड लिंक | Movie Review | chhava movie telegram link

chhava movie download link | छावा चित्रपट डाउनलोड करा.



पहिल्या वेळी मोठ्या पडद्यावर कोणीतरी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा खरा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केलाय.  औरंग्याने महाराजांना कसे हाल हाल करून मारले, तो इतिहास आज पर्यंत महाराष्ट्रामध्ये दाखवू शकले नाहीत, पण ते आव्हान 
विकी कौशल आणि टीम ने स्वीकारलं.

देश धरम पर मिटने वाला। 
शेर शिवा का छावा था।।
महापराक्रमी परम प्रतापी। 
एक ही शंभू राजा था🚩🚩
सहकुटुंब प्रत्येकाने पाहावा..
#छावा

 


Chhava Movie Telegram link - Click Here


Chhava Movie Review 

छावा : कोण म्हणते पुरुष रडत नाहीत ? कारण छावा सारखे चित्रपट बनत नाहीत. माझ्या आयुष्यात हा पहिला चित्रपट जो पाहताना मुले आणि मुली  या दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. लक्ष्मणजी उत्तेकर ; आपण खरे मराठा शोभलात. छत्रपती संभाजी राजांना भारताच्या समाजपटलावर तुम्ही न्याय दिला. अतिशय संयतपणे अनेक मुद्यांना  हात घालून कमी वेळात अतिशय मोठ्या काळाचा आणि पराक्रमाचा आढावा तुम्ही घेतला. मनापासून वाटते याचे दोन भाग आपण सहजपणे करू शकला असता. 


तांत्रिक, भावनिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या हा चित्रपट नक्कीच सुरेख बनविला. नाव ठेवायला जागाच नाही. प्रत्येक कलाकाराने आपला जीव ओतून यात काम केले. विकी कौशल या चित्रपटाचा भाग होणार हे कळल्यावर मनात गृहीतच होते कि राजांना तो अक्षरशः जगणार आणि आपल्यासमोर जिवंत करणार. त्यांच्या श्री सखी महाराणी येसूबाई ही प्रतिमा रश्मीकाने प्रेक्षकांच्या मनात कायमची घेतली. डोळ्यातले प्रेमभाव, करारीपणा, समंजसपणा हे सारे बदल अतिशय कमी वेळात दर्शविले. मातोश्री सोयराबाईंची भूमिका दिव्या दत्ता यांच्या दृष्टीतून जिवंत झाली. अक्षय खन्ना बद्दल काय बोलायचे ! त्याची भिरभिरणारी नजर आणि मोजकेच शब्द आणि त्यांच्यामधला शांत काळ याने अक्षरशः खाऊन टाकले. दूध माता धाराऊ, कवी कलश, सरनौबत हंबीरराव, बहिर्जी नाईकांचे विविध रूपे असे अनेक पात्रे  कमी वेळात आपल्या मनात ठसविली.  



Chhava movie telegram link - Click Here


राज्याभिषेकाचा प्रसंग, राजे आणि येसूबाई यांचा संवाद आणि शेवटचा प्रसंग डोळ्यातल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली होती. आसपासची मुले, मुली आणि मोठी माणसे सगळे चिडीचूप होते. डोळ्यातून वाहणाऱ्या धारा आणि दीर्घ श्वास ऐकू येत होते. आणि हे गोव्यातले दृश्य आहे. महाराष्ट्रात मी फक्त कल्पनाच करू शकतो. राजांनी शेवटच्या क्षणापर्यंत कोणासाठी आपला धर्म आणि निश्चय का नाही सोडला ? कोणासाठी हा अट्टाहास होता ? माणसे, स्वराज्य कि धर्म ?  या सगळ्यांसाठी ? पॅशन ऑफ क्राईस्ट हा चित्रपट जेव्हा २ दशकांपूर्वी पहिला होता तेव्हा येशू ख्रिस्त आपल्या सत्यासाठी मरणप्राय यातना भोगतो तेव्हा जी अवस्था होते तीच किंबहुना थोडी जास्त हा चित्रपट पाहताना झाली. जेव्हा आपल्या भावना आपल्या मातीशी , संस्कृतीशी जोडलेल्या असतात आणि आपले थोर पुरुष आणि स्त्रिया यातनेतून जाताना पाहतो तेव्हा होणारा त्रास हा खराखुरा असतो. भलेही तो ३०० / ४०० वर्षे अगोदर झालेली घटना असो. आज ती पहिल्यांदा बारकाईने दाखविली गेल्याने महाराष्ट्राची जखम पुन्हा भळभळून वाहिली. मनात प्रश्न उभा राहतो तरुण पिढीला याची किंमत आहे का ? मिरवणुकीत ज्या उन्मादात समाजाच्या वर्गणीत मुले नाचतात त्यांनी नक्कीच विचार करावा. आपल्या पूर्वजांनी या मातीत आपले रक्त शिंपडले. आपण चांगल्या कामासाठी फक्त घाम गाळला तरी पुरेसे आहे. 


सिनेमॅटोग्राफी, व्हीएफएक्स, फाईट मास्तर, कॉस्च्युम्स, शस्त्रे यात कुठेही तडजोड केली गेली नाही. संगमेश्वरचा  रणसंग्राम चित्रपटांच्या इतिहासात लढाई कशी चित्रित करावी याचा आदर्श वस्तुपाठ असेल. रणांगणात साक्षात रौद्र तांडव कसे असू शकते ते सुंदर चित्रित केले आहे. उर अभिमानाने आणि डोळ्यात पाणी देखील एकाच वेळी भरून येते. 


Chhava movie telegram link - Click Here


औरंगजेबाची सेना दिल्लीहुन निघाली कि काबुल / राजस्थानहून  एवढीच शंका आहे. कारण मध्ये वाळवंट दाखविले गेले? जे दिल्लीच्या रस्त्यात येत नाही. धनुष्य बाण वापरताना पाण्यातून एकदम ५ फूट उंचावर कसे काय उडू शकतात ? टारझन प्रमाणे खरोखरच दोरीला लटकून युध्य खेळता येणे शक्य आहे का ? या गोष्टी नक्कीच टाळता आल्या असत्या. सर्वात मोठी खंत फक्त एकच यात अजय अतुल यांची जोडी किंवा देवदत्त बाजी यांचे संगीत हवे होते. रांगडा मराठी बाज, अंगावर काटा आणणारी वाद्ये हि यांनाच जमतात. नक्कीच काही अडचणी आल्या असतील. परंतु संगीतच्या बाबतीत मात्र मन खट्टू झाले. असो. शिवशंभूंची दुग्धाभिषेकाद्वारे पूजा व शेवटच्या क्षणी ओठावर जगदंब अंगावर काटा आणतात. 


आनंदाची गोष्ट म्हणजे आमचे तीन मित्र या चित्रपटाचे भाग होते. रुद्रा आर्ट्स आणि हॅंडिक्राफ्ट्सचे सत्यजित वैद्य आणि चंद्रहास ( मृण्मय दीपक अर्बुने ) सल्लागार : शस्त्रे, कॉस्च्युम्स, सेट, दागिने यासाठी तर कौस्तुभ सावरकर स्क्रीनप्ले रायटिंगसाठी. लाल कप्तान या चित्रपटांनंतर पहिला हिंदी चित्रपट ज्यात त्या काळातले कपडे, दागिने , शस्त्रे अभ्यास करून वापरली गेलीत. प्रत्येक पात्राच्या अंगावरची वस्त्रे, फेटे, साड्या, पाणी पिण्याची सुरई, ताटातील जेवण, कोपऱ्यातील साडी आणि शस्त्रे ठेवण्याचे स्टॅन्ड, आरसे, हातातील अंगठ्या काय काय सांगू !! प्रत्येक गोष्ट निरखून पहिली आणि कुठेच उणीव दिसली नाही. नंतर इंस्टाग्रामवर पोस्ट पाहिल्यावर कळले आमचे नित्रवर्यच ही महत्वाची जबाबदारी पार पाडीत होते.  उगाच मन मानेल तसे रेक्झीनचे चिलखत, थर्माकोलच्या तलवारी वापरल्या नाहीत. त्याबद्दल दिग्दर्शकाच्या अभ्यासकांच्या निवडीबद्दल आभार. व्हायकिंग व  गेम ऑफ थ्रोन्स या पातळीवरचा एक चित्रपट बनला याचा एक मराठी माणूस म्हणून मला मनापासून आनंद झाला. 


व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी  स्वराज्यावरची एक अनोखी प्रेम कथा पाहायला मिळाली. आपल्यासाठी हा एक चित्रपट नसून आपल्या पूर्वजांची बलिदानाची कथा आहे. दिग्दर्शक जर कथेवर प्रेम करीत असला तर काय होऊ शकते त्याचे एक उत्तम उदाहरण हा चित्रपट आहे. किती वर्षे यावर त्यांनी अभ्यास केला असेल ? कशी माणसे गोळा केली असतील ? किती अडचणी आल्या असतील ? किती रात्री जागून काढल्या  असतील ? आणि त्यानंतर आपण जे पाहतोय ते अनेकांच्या आयुष्याच्या त्यागातून उभे राहिलेले चित्र आहे. प्रत्येक टीम मेम्बर्सने आपले सर्वस्व महाराजांच्या चित्रपटात काम करायला मिळते म्हणून दिले असेल. फायदा आणि तोट्याच्या पलीकडची गोष्ट जी आपल्या पुढच्या पिढीला नक्कीच दाखवा. प्रेम मग ते पत्नीवर असो, देशावर असो, लेकरांवर असो त्यासाठीचा सर्वोच्च त्याग कसा असू शकतो हे अनुभवा. 


ज्यांनी कोणी आत्तापर्यंत आपली लेखणी, कॅमेरा आणि अभिनय छत्रपतींना बदनाम करण्यासाठी झिजविले ते सर्व या चित्रपटाने अक्षरशः धुवून काढले. पुरस्कारांच्या लॉबीत कायम भारताला दुःखी आणि चुकीचे दाखविणारे लोक आणि त्यांचे वर्तुळ याला काही ना काही कारण काढून नाव ठेवतील. परंतु सर्व भारत या चित्रपटास डोक्यावर घेणार यात शंका नाही. पुढच्या पिढीच्या मनात छत्रपती संभाजी राजे स्वराज्याचे आणि धर्माचे रक्षक म्हणून अजरामर होणार. आता इथून पुढे मराठ्यांचा इतिहास कोणीही बनवायचा असेल तर त्याला छावाच्या पुढचा विचार करावा लागेल कारण बेंचमार्क खूप वरती सेट झालाय. 


महाराष्ट्रातील जन्मलेले, महाराष्ट्राच्या मातीशी इमान राखणारे आपण सर्वचजण मराठे आहेत. त्यामुळे कृपया जातपात आणि धर्म हा भेदभाव न ठेवता हा चित्रपट पाहावा. कारण आपल्याला अभिमान आपल्या पूर्वजांचा हवा परदेशात जन्मलेल्या लोकांचा नाही. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय शंभूराजे. 


लेख : योगेश कर्डीले 

छायाचित्र : छावा चित्रपट 

#chhava #chhavamovie #chhavamoviereview #LaxmanUtekar #sambhajimaharaj #vickykaushal #rashmikamandanna #DivyaDutta #AshutoshRana #SantoshJuvekar #marathaempire #marathahistory


छावा चित्रपट ट्रेलर - Click Here

Chhava movie trailer - Click Here


Chhava Movie - Click Here

छावा चित्रपट - Click Here


छावा चित्रपट डाऊनलोड लिंक - Click Here

Chhava movie download link - Click Here 


Chhava movie telegram link - Click Here


Post a Comment

0 Comments

close