माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त भाषण | Ramai jayanti speech in marathi | माता रमाबाई जयंती भाषण | Ramabai jayanti bhasan | Ramabai jayanti speech in Marathi
माता रमाई यांचा जीवनप्रवास वाचा - Click Here
माझ्या भिमाची सावली,
दिन दलितांची आई
अशी भाग्यशाली त्यागमुर्ती,
माझी आई माता रमाई
सन्माननीय व्यासपीठ, प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो....
आज त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती आहे. माता रमाई आंबेडकर हे नाव आता एका व्यक्तीचे उरले नसून ते नाव आता समाजाची एक असीम अशी चेतना बनली आहे. जगात जे महान थोर पुरुष होऊन गेले त्या थोर पुरुषांच्या जीवनात त्यांच्या घरातील स्त्रियांचा (स्त्रीचा/धर्मपत्नी चा) सिंहाचा वाटा आहे.
ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यशाच्या मागे त्यांच्या आईचा वाटा होता, ज्योतिबा फुले यांच्या यशस्वी कार्याच्या मागे त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांचा सिंहाचा वाटा होता.
त्याचप्रमाणे दलितांचे उद्धारक, भारतीय घटनेचे शिल्पकार, थोर कायदेपंडित, बोधिसत्व, युगांचा युगांधर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात त्यांच्या थोर कार्यात सुशील, कर्तव्यदक्ष, त्यागमूर्ती, विनम्रतेची व शालीनतेची मूर्ती माता रमाई यांचा सिंहाचा वाटा होता.
माता रमाई या फार कष्टाळू मेहनती व प्रेमळ होत्या. त्या बाबासाहेबांची एका बाळा प्रमाणे काळजी घेत असे अशा महान थोर माता जिने आपल्या सर्व इच्छा आकांक्षा भावनांचा त्याग करुन लाखो दलितांना स्वाभिमानाची शिकवण दिली त्या रमाई चा जन्म 07 फेब्रुवारी 1898 ला वणंदगाव येथे झाला. रमाईला एक अक्का नावाची मोठी बहीण, गौरा नावाची लहान बहीण व शंकर नावाचा लहान भाऊ होता ती चार भावंडे होते.
रमाई च्या आईचे नाव रुक्मिणी होते व तिच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे असे होते. रमाई च्या आईची तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती व रमाई च्या वयाच्या सहाव्या वर्षी त्यांची आई रुक्मिणी चे निधन झाले. रमाई व तिची भावंडे आईविना पोरकी झाली. रमाई च्या मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यामुळे घराची सगळी जबाबदारी ही रमाई वर आली होती.
रमाई आपल्या सगळ्या जबाबदारी चोखपणे पार पाडायच्या. त्या पहाटे लवकर उठून घरातील सर्व कामे करायच्या. भिकू तिला म्हणायचे कि तू दुसरी रखमाच आहे माझं बाळ लय गुणाच हाय. पण काळाच्या ओघाने त्यांचे वडील भिकू हे आजारी पडले. कालांतराने त्यांचा टी.बी या आजाराने मृत्यू झाला.
आईचे दुःख विसरले नाही की तोवरच वडिलांचा मृत्यूच्या दुःखाने त्यांना घेरले. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच भिकू चा भाऊ व रुक्मिणी चा भाऊ लगेच धावत आले. त्या दोघांनी भिकू चे अंतिम कार्य उरकले व त्या तीनही भावंडांना घेऊन मुंबईला गेले.
वयाच्या नवव्या वर्षी रमाई चा विवाह भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी झाला. त्यावेळेस बाबासाहेबांचे वय 14 वर्ष होते ते नुकतेच मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. रमाई या बाबासाहेबांच्या मनाचा आधार व विसावा बनल्या होत्या. त्यांचा संसार चालू झाला रमाई या बाबासाहेबांची काळजी एका आईप्रमाणे घेत असत, त्या त्यांना त्यांच्या सर्व कामांमध्ये वेळोवेळी मदत करत असत. याचाच एक प्रसंग पाहूया.
१९१८ साली भिमराव मुंबईत होते. त्यावेळी भीमराव सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या नोकरीवर रुजू झाले होते. भिमरावना 450 रुपये पहिला पगार मिळाला होता पहिला पगार रमाईच्या हातात ठेऊन भीमरावांनी तो तिला मोजायला लावला.
त्यावर रमाई म्हणते मी तर अडाणी आहे एवढे पैसे कसे मोजणार पहिला पगार रमाईच्या हाती देऊन तिला घरातील धन धान्य सामान आण असे भीमराव म्हणतात.
रमाईने दुसऱ्या दिवशी झालेल्या भरले. आपल्या पतीचा पहिला पगार म्हणून रमाईने तिच्या बहिनी तुळजा मंजुळा गंगा यांना साडीचोळी जावेला साडीचोळी आणि मुलांना कपडे घेतले. पगाराची सर्व पैसे संपवले काही दिवस गेले व रमाईने भीमराव "साहेब पैसे हवे होते" असे म्हटले त्यावर भीमराव म्हणतात रमा सर्व पैसे खर्च केलेत? अगं इतके पैसे खर्च करून जमणार नाही. मी कायमची नोकरी करणार नाही मला परत पुढील शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे रमाई मनात दुखी झाली आणि म्हणाली साहेब परदेशात जाणार, बाबासाहेब रमाबाई ला पुढच्या महिन्यापासून पन्नास रुपये देऊ लागले.
रमाई बाबासाहेबांनी दिलेल्या त्या पन्नास रुपयाच्या दीड रुपयाची एक अशा तीस पुड्या बांधून ठेवीत असे. व रोज एक पुडी सोडून त्यातील दीड रुपये खर्च करीत. अशाप्रकारे रमाई महिन्याला पंचेचाळीस रुपये खर्च करून पाच रुपयांची बचत करत असे. कधी भीमरावांना पुस्तकासाठी पैसे कमी पडले तर आपल्या बचतीतून त्या त्यांना ते बचतीचे पैसे देत असे.
अशा निस्वार्थ त्याग मूर्ती रमाई चे जितके गुणगान गावे तितके कमी आहे. अशा थोर विनम्र व शालीनतेच्या मूर्तीला माता रमाई ला वंदन करतो व पुन्हा एकदा रमाई जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो.
भिमरावांच्या कार्यात दिला मदतीचा हात
केली हिंमतीने प्रत्येक संकटांवर मात
पुण्यवान, धैर्यशील, हिंमतवान बाई
सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई..
जय भीम जय भारत
0 Comments