शिक्षक पात्रता परीक्षा (TET)-२०१९ या परीक्षेतील गैरप्रकारांशी संबंधित उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत अनुसरावयाची कार्यपद्धती बाबत शासन परिपत्रक Regarding the appointment of candidates related to misconduct in the TET exam
शिक्षक पात्रता परीक्षा-२०१९ मधील गैरप्रकाराच्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर, पुणे येथे दाखल असलेल्या गु.र.नं. ५६/२०२१ व ५८/२०२१ या प्रकरणी झालेल्या तपासात ज्या उमेदवारांची नावे आढळून आली आहेत व ज्यांनी सीटीईटी अथवा बी.एड या आधारावर TAIT-२०२२ ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे व ज्यांनी शिक्षण सेवक पदावर नियुक्ती मिळावी म्हणून मा. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर न्यायनिर्णय पारीत झाले आहेत, अशा उमेदवारांच्या संदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
TET घोटाळ्यातील 5 शिक्षण सेवकांन बडतर्फ करणेबाबत जि. प. सोलापूर चे आदेश
TET परीक्षेतील गैरप्रकारांशी संबंधित उमेदवारांना नियुक्ती देणेबाबत अनुसरावयाची कार्यपद्धती
सर्व उमेदवारांच्या बाबतीत स्वतंत्रपणे सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्याकडून चारित्र्य पडताळणी अहवाल प्राप्त करुन घेण्यात यावा. नियुक्ती प्राधिकारी यांनी यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करावा, उमेदवारावर गुन्हा नोंदविण्यात आल्याचे अथवा त्यारा सह आरोपी केले असल्याबाबत अहवाल प्राप्त झाल्यास त्यास नियुक्ती देण्यात येऊ नये. उमेदवारावर अद्यापि गुन्हा नोंदविण्यात आला नाही अथवा त्यास सह आरोपी करण्यात आले नाही, असा अहवाल प्राप्त झाल्यास त्यास नियुक्ती देण्यात यावी. नियुक्ती देण्यापूर्वी उमेद्वाराने Notarized शपथपत्र सादर करणे आवश्यक आहे. जे उमेदवार NOTSRIZED शपथपत्र सादर करतील त्यास शिक्षण सेवक पदावर नेयुक्ती देण्याबाबतची कार्यवाही नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी करावी.
Notarized शपथपत्र नमुना
मी ...................................... वय-............... रा..................... भ्रमणध्वनी क्र........................... शपथपूर्वक असे नमूद करतो की, शिक्षक पात्रता परीक्षा-२०१९ मधील गैरप्रकारांशी संबंधित प्रकरणात सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गु.र.नं. ५६/२०२१ व ५८/२०२१ या गुन्हयांची नोंद आहे. या गुन्हयाच्या तपासात माझे नाव आढळून आले आहे. पोलिस यंत्रणेकडून करण्यात येत असलेल्या तपासात भविष्यात कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात अथवा गैरप्रकारात माझा सहभाग आढळून आल्याने माझ्यावर गुन्हा नोंदविण्यात आल्यास अथवा मला सह आरोपी करण्यात आल्यास व तसा अहवाल आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य/आयुक्त, महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद/संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांना प्राप्त झाल्यास माझी नियुक्ती कोणत्याही पूर्व-सूचनेशिवाय संपुष्टात आणली जाईल याची मला जाणीव असून तसे करण्यास माझी कोणतीही हरकत नाही.
![]() |
Notarized शपथपत्र नमुना |
TET 2019 परीक्षेतील गैरप्रकारांशी संबंधित उमेदवारांना नियुक्ती देणेबाबत अनुसरावयाची कार्यपद्धती बाबत शासन परिपत्रक - Click Here
0 Comments