टीईटी घोटाळ्यातील 5 शिक्षण सेवकांची सेवासमाप्ती; परीक्षेतील गुणापेक्षा प्रमाणपत्रावर जास्त गुण, 'टीईटी' परीक्षेच्या घोटाळ्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवून प्राथमिक शिक्षण विभागाकडील पाच शिक्षण सेवकांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सेवा समाप्तीची कारवाई केली आहे.
जिल्हा परिषदेने त्यांना २६ जुलै २०२४ रोजी शिक्षण सेवकपदी नियुक्तीचा आदेश दिला. जिल्हा परिषदेने केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीत पुण्याच्या सायबर पोलिसांत दाखल गुन्ह्यातील संशयितांत या पाच शिक्षणसेवकांचा समावेश असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांनी खोटी व बनावट कागदपत्रे सादर करुन शिक्षण सेवकपदी नियुक्ती मिळविल्याचा ठपका ठेवून मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी त्यांच्यावर सेवामुक्तीची कारवाई केली आहे.
'या' शिक्षण सेवकांवर झाली कारवाई
नाव, शाळेचे नाव, परीक्षेतील गुण, प्रमाणपत्रावरील गुण
दिलीप भोये काळेवाडी, ता. सांगोला ७४-८६
कांतीलाल बहीराम गावडे गायकवाडवस्ती, ता. सांगोला ६०- ८४
परशुराम वाकडे कोळेकरवाडी, ता. सांगोला ६०-८७
प्रियदर्शिनी भिसे पेहे, ता. पंढरपूर ६२-८६
उर्मिला गंभीरे भिवरवाडी, ता. करमाळा ५७ -८७
सेवा समाप्ती आदेश
मा. आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे प्राप्त शिक्षणसेवक निवड यादीतील उमेद्वारांमध्ये तुमचा समावेश असुन संदर्भिय पत्रामध्ये नमूद सार्गदर्शक सुचना व अटी शर्ती नुसार दिनांक ७.०३.२०२४ रोजी आपणास कागदपत्रे पडताळणीसाठी तपस्थित राहणेबाबत सुचना देण्यात आलेल्या होत्या व सदर दिवशी आपण उपस्थित होता. सदर कागदपत्रे तपासणी दरम्यान आपण कोणतेही गैरप्रकारामध्ये समाविष्ठ नाही व दिलेले कागदपत्रे ही सत्य असुन यामध्ये कोणतीही कागदपत्रे चुकीचे अगर बोगस आढळलेस आम्ही शास्तीस पात्र आहे, याबाबत स्वयंघोषणापत्र आपण स्वतः स्वाक्षरीने दिलेले आहे. तसेच समुपदेशादरम्यानही याबाबत सक्त सुचना देण्यात आलेले असतानाही आपण सादर केलेली कागदपत्रे यांच अवलोकन करता आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा (TET) २०१८ व २०१९ मधील गैरप्रकारामध्ये नोंद असलेले अफ्र ५६/२०२१५५८/२०२१ अन्वये सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा नोंद असलेले ७८४, उमेदवारांमध्ये आपाला समावेश असुन सदर बाबत पडताळणी केली असता संदर्भ क्रमांक ८ चे पत्रान्वये या कार्यालयास अवगत केलेले आहे. यानुसार मा. आयुक्त (शिक्षण) यांचेकडील दिनांक १४.१०.२०२२ व ०३.०८.२०२३ चे आदेशान्वये गैरप्रकारातील विद्यार्थ्यांची सदर परिक्षेतील संपादणूक रदद करुन यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परिक्षेसाठी कायमस्वरुपी प्रतिबंधीत केलेलं असताना व सदर बाब ही आपणास ज्ञात असताना आपण जाणून बुजुन या कार्यालयास (CTET) प्रमामापत्र सादर करून या कार्यालयाची दिशाभूल, फसवणुक केलेचे प्रथमदर्शनी निर्देशनाला आलेले आहे, तसेच कागदपत्रे तपासणी दरम्यान आपण सादर केलेले स्वंयः साक्षांकनासाठी स्वयंघोषणापत्र प्रमाणपत्रामध्ये चुकीची व दिशाभूल करणारी माहिती सादर केलेली आहे, याबाबत आपणास परिपुर्ण माहिती असताना सदरची बाब उघड न करता चुकीची कागदपत्रे कार्यालयास सादर करून समुपदेशनाने नियुक्ती आदेश मिळवलेले आहेत. ही बाब गंभीर आहे.
तसेच आपणास दिनांक २६.०७.२४ रोजी दिलेले नियुक्ती आदेशामधील अंक १ ते २७ मधील नमूद अटी व शर्ती स्पष्टपणे नमुद असताना व आपणास याची जाणीव असताना याबाबत आपण कार्यालयास अवगत केलेल नाही संदर्भक्रमांक ७ अन्याये याबाबत आपण (TET) गैरप्रकार सन २०१८ व २०१९ मधील गैरप्रकारामध्ये समाविष्ठ एकुण ७८७४. उमेदवारावरती सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे अनुक्रमे गु.र.न.५६/२०२५ ५ ५८/२०२१ अन्वये गुन्हा दाखाल उमेदवारामधी आपला समावेश असलेबाबत संदर्भ क्र.८ अन्वये पोलीस निरीक्षक पुणे शहर यानी आपले पत्रामध्ये नमुद केलेले आहे. त्याबाबत सविस्तर तपशिल त्यांनी खालीलीप्रमाणे नमूद केलेला आहे.
वरील नमूद प्रमाणे आपण (TET) गैरप्रकारामध्ये समाविष्ट असलेचे सिध्द झाले आहे. तथापी सदरची बाब आपणास अवगत असताना कार्यालयास चुकीची माहिती देणे सत्य माहिती लपविणे व प्रशासनास खोटी व बनावट कागदपत्रे सादर करन कार्यालयाची दिशाभूल करून नियुक्ती आदेश मिळवलेचे सिध्द होत असलेने आपण उपरोक्त संदर्भान्वये मधील शासन निर्णामधील मुददा क्र. 5.10 मध्ये नमूद केलेप्रमाणे आपणास जिल्ला परिषद सेवेतून सेवामुक्त करणेत येत आहे. सदर आदेशाची अमलबजावणी तात्काळ करणेत यावी.
शिक्षण सेवकंची सेवा समाप्त करणेबाबत आदेश डाउनलोड करा. - Click Here
0 Comments