Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

TET घोटाळा | सन २०१९-२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा TET मध्ये 7880 उमेदवार दोषी. | संपादणूक रद्द | परीक्षेस कायमस्वरूपी प्रतिबंध

महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) परीक्षा 2019 दि. 19/01/2020 च्या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्हयाच्या अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ठ उमेदवारांची संपादणूक रद्द करुन त्यांना परीक्षा परिषदेच्या यापुढील सर्व परीक्षांना कायमस्वरूपी प्रतिबंध करण्यात आला आहे. 

ज्याअर्थी, दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपासादरम्यान परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिकांची कसून तपासणी करून घेतली त्यात असे निष्पन्न झाले की, ७८८० उमेदवारांनी परीक्षेत गैरप्रकार केले आहे. म्हणजे प्रत्यक्षात ते अपात्र असतांना त्यांनी गैरप्रकार करून स्वतःस पात्र करून घेतले. 

1) गुणामध्ये फेरफार करून पात्र होणे. 7500 उमेदवार

परिशिष्ट अ मध्ये नमूद ७५०० उमेदवारांच्या गुणामध्ये फेरफार करून अपात्र असतांना देखील अंतरिम / अंतिम निकालामध्ये सदर उमेदवारांना पात्र जाहीर करण्यात आलेले आहे. सबब सदर उमेदवारांच्या बाबतीत पुढील प्रमाणे कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे.

> उमेदवारांची सदर परिक्षेतील संपूर्ण संपादणूक रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परिक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करणे.

यादी डाउनलोड करा. - Click Here

Join WhatsApp Group

https://chat.whatsapp.com/GhqtfzqFL8NJjI8j52j57z


2) बनावट प्रमाणपत्र प्राप्त करणे 293 उमेदवार


परिशिष्ठ व मध्ये नमूद २९३ उमेदवार हे अंतरिम / अंतिम निकालामध्ये अपात्र आहेत. त्यामुळे त्यांना परीक्षा परिषदेच्या विहित पध्दतीने प्रमाणपत्र वितरित झालेले नाहीत. तथापि त्यांनी बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतलेले आहे अथवा प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सबब सदर उमेदवारांच्या बाबतीत पुढील प्रमाणे कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे. 

उमेदवारांची सदर परिक्षेतील संपूर्ण संपादणूक रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परिक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करणे.

यादी डाउनलोड करा. - Click Here

online test series for TET MARATHI join now for free

MAHA TET Exam unit wise Videos for all subjects and guess Question Video


3) परिशिष्ट क मध्ये नमूद ८७ हे उमेदवार आरोपीकडून तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे सायबर पोलिस स्टेशन, पुणे शहर यांनी निश्चित केलेले आहेत. त्यापैकी ६ उमेदवारांचा परिशिष्ठ अ मध्ये नमूद ७५०० उमेदवारांमध्ये समावेश आहे. उर्वरित ८१ उमेदवारांपैकी ७६ उमेदवार हे अंतरिम / अंतिम निकालामध्ये अपात्र आहेत व ३ उमेदवार परीक्षेस अनुपस्थित आहेत, त्यामुळे सदर सर्व उमेदवारांच्या बाबतीत पुढील प्रमाणे कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे. 

उमेदवारांची सदर परिक्षेतील संपूर्ण संपादणूक रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परिक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करणे.

यादी डाउनलोड करा. Click Here


4) परिशिष्ठ क मध्ये नमूद २ उमेदवारांची परीक्षेसाठी नोंदणी झालेली नाही. यांची माहिती परिक्षेच्या कोणत्याही माहितीशी जुळत नाही. यांचेबाबतीत पुढील प्रमाणे शास्ती प्रस्तावित करण्यात येत आहे.

> यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधीत करणे.

यादी डाउनलोड करा. Click Here

एकुण ७८८० पैकी ६ उमेदवारांची नावे दुबार असल्याने अंतिम कारवाई उपरोक्त ठरावाप्रमाणे एकूण ७८७४ उमेदवारांबाबत करणेस मान्यता देण्यात आलेली आहे.

Post a Comment

0 Comments

close