Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्वच्छोत्सव विशेष मोहिम २०२५ अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांच्या किरकोळ दुरुस्ती व रंगकाम (White Washing / Painting work) करुन घेणेबाबत.

स्वच्छोत्सव विशेष मोहिम २०२५ अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांच्या किरकोळ दुरुस्ती व रंगकाम (White Washing / Painting work) करुन घेणेबाबत.


केंद्र शासनाचे दि. २४/०९/२०२५ रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे स्वच्छोत्सव विशेष मोहीम ५.० चा भाग म्हणून राज्यातील शाळांना दि.३१/१०/२०२५ पर्यंत दुरुस्ती, व्हाईट वॉश, रंगकाम, तसेच शाळा परिसर सुशोभीकरण करणेबाबत सूचना दिल्या आहेत. 


या संदर्भात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या शाळांना आवश्यकतेनुसार दुरुस्ती, व्हाईट वॉश, रंगकाम, तसेच शाळा परिसर सुशोभीकरण दि.३१/१०/२०२५ पर्यंत पूर्ण करुन घेण्यात यावे. याकरिता लागणारा निधी शासनाच्या इतर योजनेतून, CSR निधीतून, जिल्हा वार्षिक योजनेतून, संयुक्त शाळा अनुदान मधून उपलब्ध करुन कामे दि.३१/१०/२०२५ पर्यंत करुन घेण्यात येणार आहेत. 

स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या शाळांना आवश्यकतेनुसार दुरुस्ती, व्हाईट वॉश, रंगकाम, तसेच शाळा परिसर सुशोभीकरण करणे याबाबत राज्य प्रकल्प समन्वयक तथा सह संचालक (प्रशासन), यांनी सर्व आयुक्त, महानगरपालिका सर्व, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व, मुख्याधिकारी नगरपालिका / नगरपरिषद (सर्व) यांना परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. 


स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या शाळांना आवश्यकतेनुसार दुरुस्ती, व्हाईट वॉश, रंगकाम, तसेच शाळा परिसर सुशोभीकरण करणेबाबत परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here


Post a Comment

0 Comments

close