शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत सन 2026-27 या वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. नवोपक्रम स्पर्धेसाठी नवोपक्रम अहवाल लेखन कसे करावे? जाणून घेऊया.
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2025-2026 निकाल pdf पहा.
नवोपक्रम 2026-27 अपडेटसाठी WhatsApp Group जॉईन करा.
Join WhatsApp - शालेय शिक्षण नवोपक्रम ग्रुप
https://chat.whatsapp.com/GWa8Hp0j9nn2lfy5L3Bwdm?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
नवोपक्रम स्पर्धा गट प्रकार
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पुढील पाच गटात आयोजन करण्यात येत आहे.
१. पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/ सेविका व पर्यवेक्षिका
२. प्राथमिक गट - पायाभूत स्तर (प्राथमिक शिक्षक - इ.१ ली व २ री)
३. प्राथमिक गट - पूर्वतयारी स्तर (प्राथमिक शिक्षक आणि मुख्याध्यापक - इ.३ ते ५)
4. प्राथमिक गट - पूर्व माध्यमिक स्तर (प्राथमिक पदवीधर आणि मुख्याध्यापक - इ.६ ते ८)
5. माध्यमिक गट - माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक (इयत्ता ९ वी ते १२ वी)
6. विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती व शिक्षकेतर कर्मचारी
7. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी तसेच अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता व प्राचार्य)
नवोपक्रम अहवाल लेखन मुद्दे:
नवोपक्रम अहवाल लेखन पुढील मुद्यांच्या आधारे करावे.
१.नवोपक्रमाचे शीर्षक - उपक्रमाचे नेमके नाव लिहावे.
२.नवोपक्रमाची गरज व महत्त्व - उपक्रम निवडण्याचे कारण, उपक्रमाचे वेगळेपण, उपयुक्तता इ.चा तपशील.
३.नवोपक्रमाची उद्दिष्टे - हा उपक्रम मी का करतो आहे, उपक्रमाचा फायदा कोणाला? कसा,कोणत्या स्वरुपात, कोणत्या कृतीमुळे होणार? या उपक्रमातून काय व कोणासाठी साध्य होणार,याबाबत ३ ते ५ विधानात्मक उद्दिष्टे मांडावीत.
४.नवोपक्रमाचे नियोजन -
i) उपक्रमपूर्व स्थितीचे निरीक्षण
ii) संबंधित व्यक्तींशी, तज्ज्ञांशी चर्चा
iii) आवश्यक साधनांचा विचार
iv) करावयाच्या कृतींचा क्रम
v) उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण
vi) कार्यवाहीचे टप्पे (वेळापत्रक)
vi) उपक्रमासाठी इतरांची मदत
viii) उपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे.
५.नवोक्रमाची कार्यपद्धती -
I) पूर्वस्थितीची निरीक्षणे व त्यांच्या नोंदी II) कार्यवाहीदरम्यान निरीक्षणे व माहिती संकलन
III) उपक्रम पूर्ण झाल्यावर निरीक्षणे व त्यांच्या नोंदी
IV) कार्यवाहीत आलेल्या अडचणी
V) माहितीचे विश्लेषण : आलेख, तक्ते (आवश्यक वाटल्यास)
६.नवोपक्रमाची यशस्विता / फलनिष्पत्ती (उद्दिष्टानुसार) या उपक्रमातून कोणासाठी व काय सध्या झाले, याबाबतची मांडणी यात करावी. उद्दिष्टनिहाय फलश्रुती लिहावी. आवश्यकता वाटल्यास त्याकरिता शेकडेवारी व आलेखाचा वापर करता येईल. अन्यथा वर्णनात्मक विधाने करावी. त्याचप्रमाणे आपण उपक्रमांतर्गत केलेल्या विविध कृतींची फलश्रुती मांडवी.
७.समारोप - आपली अस्वस्थता उपक्रमानंतर कशी दूर झाली व उपक्रमाचा उपयोग गुणवत्ता वाढीकरिता कसा झाला, हे विशद करावे.
८.संदर्भसूची व परिशिष्टे - नवोपक्रम करताना ज्या संदर्भग्रंथांचा वापर केला, त्यांची सूची द्यावी तसेच सहभागी वर्गातील विद्यार्थी व आवश्यकता असल्यास त्यांच्यासाठी तयार केलेली पूर्वचाचणी, उत्तर चाचणी, प्रश्नावली इ. जे असेल ते परिशिष्टामध्ये जोडावे.
नवोपक्रम सादर करण्याचा कालावधी -
दि. 02/11/2026 ते दि.20/11/2026 पर्यंत नवोपक्रम सादर करता येतील.
नवोपक्रम सादर करण्यासाठी लिंक 2026-27
नवोपक्रम सादर करण्यासाठी लिंक
नवोपक्रम स्पर्धा सन 2026-27 शासन परिपत्रक PDF डाउनलोड करा.



0 Comments