Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तुझे सूर्यदेव नाव


पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव
प्रभातीच येशी सारा जागवीत गाव

विधाता जगाचा तूची उधळीत आशा
उजळिशी येता येता सभोवती जग दिशा
रथ तुझा सोनियाचा धावे भरधाव

अंधारास प्रभा तुझी गिळे प्रभाकर
दिवसा तू ज्ञानदीप लावी दिवाकर
सृष्टीला या चैतन्याचा तुझा पेहराव

पुष्पपत्रदानाची रे तुला नसे आस
तूच चालुनिया येशी माझिया घरास
भक्ताठायी गुंतलासे तुझा भक्तिभाव

Post a Comment

0 Comments

close