*चरबीच्या गाठी - - - - -*
*कारणे ---*
व्यायामाचा अभाव, भूकेपेक्षा जास्तच खाणे, वारंवार जडान्न घेणे, पोट साफ न होणे, मांसाहार जास्त घेणे, जास्त वजन वाढणे. कॅल्शिअम कमी होणे. इ.
*उपाय ---*
१) वरील कारणे कमी करा.
२) प्राणायाम, योगासने, अॅक्युप्रेशर, मसाज करा. चरबीच्या गाठी लवकर नष्ट होतील. तसेच श्वासावर व्यायाम करा.
३) भुईचाफ्याची मुळी व धूप उगाळून त्याचा लेप करा. चरबीच्या गाठी नष्ट होतात.
४) माक्याचा रस किंवा विड्याच्या पानांचा रस गाठींवर चोळून चोळून दररोज २ / ३ महिने लावणे. गाठी जातात.
५) विड्याच्या पानाला फक्त चूना लावून पान खाणे. किंवा एका गव्हाच्या दाण्याएवढा चूना दह्यातून अगर ताकातून खाणे. चांगला लाभ होतो. किडणी स्टोन असल्यास चूना खाऊ नये.
६) वारंवार कोमटच पाणी पिण्याची सवय करा.
७) सकाळी अनोशापोटी एक ग्लास कोमट पाणी + २ चमचे मध मिक्सकरुन घेणे.
८) हालकाच आहार घेणे. एकाचवेळी पोटभर खाऊ नका.


0 Comments