Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खाद्यपदार्थातील शरीरास आवश्यक खनिजे कशी मिळवाल?

*▪कॅल्शिअम कशात असतं?*
शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर

*कमतरतेमुळे काय होतं?*
हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे

*कार्य काय असतं?*
शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.

*▪लोह कशात असतं?*
खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी

*कमतरतेमुळे काय होतं?*
शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.

*कार्य काय असतं?*
शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं.

*▪सोडिअम कशात असतं?*
मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं

*कमतरतेमुळे काय होतं?*
रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.

*कार्य काय असतं?*
शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.

*▪आयोडिन कशात असतं?*
शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण.

*कमतरतेमुळे काय होतं?*
थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.

*कार्य काय असतं?*
शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.

*▪पोटॅशिअम कशात असतं?*
सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम.

*कमतरतेमुळे काय होतं?*
अ‍ॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.

*कार्य काय असतं?*
शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.

*▪फॉस्फरस कशात असतं?*
दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे.

*कमतरतेमुळे काय होतं?*
ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.

*कार्य काय असतं?*
मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.

*▪सिलिकॉन कशात असतं?*
गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध,

*कमतरतेमुळे काय होतं?*
कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.

*कार्य काय असतं?*
जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.

*▪मॅग्नेशिअम कशात असतं?*
बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं.

*कमतरतेमुळे काय होतं?*
उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.

*कार्य काय असतं?*
पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.

*▪सल्फर कशात असतं?*
दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण.

*कमतरतेमुळे काय होतं?*
प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.

*कार्य काय असतं?*
इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.

*▪क्लोरिन कशात असतं?*
पानी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध.

*कमतरतेमुळे काय होतं?*
अ‍ॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अ‍ॅलर्जी.

*कार्य काय असतं?*
सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.

*🔸खाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे.🔸*

»  फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.

»  डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत.

»  काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.

»  दुधात खनिजांचा भरपूर स्रोत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.

»  फळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत.

*वेळीच जागे व्हा आणि निरोगी जीवन जगा ..*

योग्य आहार घ्या ! लठ्ठपणा हटवा !
◼◼◼◼◼◼◼◼◼◼

Post a Comment

0 Comments

close