*सातवा वेतन आयोग महत्वाचे*
काल मंगळवार दिनांक 12/03/2019 रोजी माननीय लेखाधिकारी अजित शिंदे साहेब यांची भेट घेऊन सातव्या वेतन आयोगासंदर्भात विविध शंकांचे निरसन केले. यामध्ये सातव्या वेतन आयोगात वेतन निश्चिती करताना येणाऱ्या विविध अडचणी, प्रश्न लेखा अधिकाऱ्यांना विचारले.
खालील प्रकारे लेखा अधिकारी अजित शिंदे साहेब यांनी शंकांचे निरसन केले
प्रश्न-1) सातव्या वितरण आयोगामध्ये विकल्प कोणत्या तारखेचा घ्यावा?
उत्तर- सातव्या वेतन आयोगामध्ये 1 जानेवारी 2016 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांसाठी 1 जानेवारी 2016 या तारखेचा विकल्प घ्यायचा आहे.याबाबत व्हाट्सअप वरून प्रसिद्ध होणाऱ्या पीडीएफ फाईल किंवा काही व्यक्तींच्या मते 1 जुलै 2016 चा विकल्प घेणे फायदेशीर आहे हे असे मत आहे पण लेखाधिकारी शिंदे साहेब यांनी 1 जुलै ऐवजी 1 जानेवारी 2016 चा विकल्प घेणे बंधनकारक आहे असे सांगितले. तरीसुद्धा याबाबत शासन स्तरावर मार्गदर्शन मागितले आहे.
प्रश्न-2) 1 जानेवारी 2016 नंतर ज्यांना वरिष्ठ किंवा निवड श्रेणी किंवा पदोन्नती मिळत असल्यास कोणता विकल्प घ्यावा किंवा कसे?
उत्तर- 2 जानेवारी ते 1 जुलै दरम्यान ज्या लोकांना वरिष्ठ किंवा निवड श्रेणी किंवा पदोन्नती मिळत असल्यास त्यांनी 1 जुलै या तारखेचा विकल्प घ्यावा व त्यानंतर दोन जुलैपासून 1 जानेवारी पर्यंत च्या लोकांनी आहेत त्यात तारखेचा विकल्प घ्यावा.
प्रश्न-3) वरिष्ठ किंवा निवड श्रेणी साठी जादा वेतनवाढ द्यायची आहे किंवा कसे?
उत्तर- शिक्षकांना वरिष्ठ किंवा निवड श्रेणी साठी जादा वेतनवाढ देय नाही पण वेतन निश्चिती करताना एका मॅट्रिक्स स्तरातून दुसऱ्या वरिष्ठ श्रेणीच्या मॅट्रिक्स स्तरामध्ये लगतच्या टप्प्यावर वेतन निश्चित करावे.
प्रश्न-4) वरिष्ठ किंवा निवड श्रेणी साठी 10,20 किंवा 30 वर्षे निर्णयाचा लाभ शिक्षकांना होणार किंवा कसे?
उत्तर-अद्याप शिक्षकांच्या वरिष्ठ किंवा निवड श्रेणी साठी 10,20 किंवा 30 वर्ष जीआर आलेला नाही.
प्रश्न-5) वेतन पडताळणी कॅम्पचे नियोजन कसे?
उत्तर- वेतन पडताळणी साठी शाळांचे प्राथमिक, माध्यमिक नुसार येत्या काही दिवसात नियोजन करून त्याप्रमाणे पडताळणी केली जाईल तोपर्यंत हमीपत्राच्या आधारे वेतन अदा करण्यास हरकत नाही.
प्रश्न-6) शिपाई या संवर्गात कमाल टप्प्याच्या वर ज्यांचे वेतन गेलेले आहे, त्यांची वसुली करावी किंवा कसे?
उत्तर- कमाल टप्प्याच्या वर ज्यांचे वेतन गेले आहे अशा शिपायांची की फेरवेतन निश्चिती करून त्याप्रमाणे सातव्या वेतन आयोगाचे मूळवेतन निश्चित करावे. जादा वेतन अदा झाले असल्यास त्याची वसुली करावी.
प्रश्न-7) ज्यांची नेमणूक 2004 किंवा 2005 या वर्षात झालेली आहे, त्यांना सातव्या वेतन आयोगा मध्ये फारसा फरक दिसत नाही कारण काय?
उत्तर- सहाव्या वेतन आयोगा मध्ये बारा वर्षे पूर्ण झाल्याने अशा लोकांना 4200 ग्रेड पे दिलेला आहे याचा अर्थ 1400 रुपये वाढ दिली आहे, पण सातव्या वेतन आयोगा मध्ये एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात वेतन निश्चित झाल्यावर केवळ 700 रुपये वाढतात, अगोदरच जास्त वेतन दिले असल्याने फरकाची रक्कम कमी येते.
प्रश्न-8) 1 जुलै रोजी नियुक्ती,पदोन्नती, वरिष्ठ किंवा निवड श्रेणी असल्यास पुढील वेतनवाढ 1 जानेवारीस देता येते काय?
उत्तर- अद्याप देता येत नाही तसा शासन निर्णयामध्ये उल्लेख नाही पण या बाबत मार्गदर्शन मागविले आहे.


0 Comments