Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सातवा वेतन आयोग चटोपाध्याय विकल्प कसे द्यावेत? - ४

*वेतन आयोग चटोपाध्याय वेतनश्रेणी मिळाल्यानंतर स्वीकारण्याबाबत होणाऱ्या चर्चेबद्दल*

*✒अमोल शिंदे*✒

ज्या दिवशी चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू होते त्यादिवशी च्या बेसिक नुसार वेतन आयोग स्वीकारण्याबाबत बऱ्याच व्हाट्सअप ग्रुप वर चर्चा आहे. त्याबाबत काल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता. *सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 किंवा 1 जुलै 2016 यापैकी एका तारखेस स्वीकारता येतो.* दोन्ही तारखाच्या बेसिक नुसार सुधारित वेतन किती होते पाहून ज्यामध्ये अधिक लाभ होतो तो निवडता येते.मात्र त्या शिवाय इतर तारखांना सुधारित वेतन संरचना स्वीकारण्याचा विकल्प देता येत नाही.असे निदर्शनास आले.त्यामुळे 1 जानेवारी 2016 नंतर पदोन्नती तसेच चटोपाध्याय वेतनश्रेणी मंजूर झालेल्या शिक्षकांच्या वेतन निश्चिती बाबत सुरू असणाऱ्या विविध चर्चा बाबत नेमकी माहिती घेवून याबाबत चर्चा करायला हव्यात.
*आश्र्वासित प्रगती योजना 10 वर्षांपासून लागू होईल,तसे झाल्यास त्यावेळी विकल्प द्यावा लागेल.तसेच दोन वर्षे आधीपासून हा लाभ 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीतील संबंधितांना फरका सहित मिळणार आहे.याचा ही विचार नफा तोटा ठरवताना करावा,तसेच पुढील स्तर ही सहाव्या मध्ये 24 व्या वर्षी बदलणार होता तो सातव्या वेतन आयोग मध्ये 20 व्या वर्षी बदलणार आहे.त्यामुळे इतर प्रमाणे शिक्षकांना ही 10/20/30 ही आश्र्वासित प्रगती योजना लागू झाल्यास आपल्या सर्वांना होणारा लाभ समप्रमाणात असेल.*

अमोल शिंदे
जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली.
9420453475

*(वरील मत विविध जाणकार व्यक्तींशी चर्चे नंतर व्यक्त केले असून याबाबत मतांतरे असू शकतात)*

Post a Comment

0 Comments

close