Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शासन निर्णय - राज्यातील 488 शाळा होणार आदर्श...

राज्यातील 488 जिल्हापरिषद शाळांची आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे. या शाळांचा शैक्षणिक, भौतिक विकास करण्यात येणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.




300 आदर्श शाळा
Download GR 26 ऑक्टोबर 2020  Click Here


488 आदर्श शाळा
Download GR 05 मार्च 2021  Click Here

For Educational update join WhatsApp

राज्याच्या अर्थसंल्पीय अधिवेशनात राज्यातील ४८८ शाळा आदर्श शाळा म्हणून निवडण्याची घोषणा करण्यात आली होती. यानुसार प्रत्येक तालुक्यातील एक अशा ४८८ शाळांची निवड करण्यात आली आहे. या निवडलेल्या शाळा पहिली ते सातवीच्या असून त्यांना आठवीचे वर्ग जोडण्यात येणार आहेत. या शाळांचा विविध स्तरावर विकास केला जाणार आहे. यात भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, आयसीटी आणि विज्ञान प्रयोगशाळा यांचा समावेश असणार आहे. तर शैक्षणिक सुविधांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाच्या चौकटी बाहेरील शिक्षण दिले जाणार आहे. यात वाचनावर विशेष भर देण्यात येणार आहे तर विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर भाषा व गणित विषयातील मुलभूत संकल्पना शिकविल्या जाणार आहेत. तर ग्रंथलयांमध्ये पूरक शिक्षण देणारी पुस्तके, विश्वकोष उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना नेतृत्व गुणांचे कौशल्यही शिकविले जाणार आहे.
तसेच दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा भरेल असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईतील अनुदानित शाळांचाही यामध्ये समावेश करावा अशी मागणी शिक्षक परिषेदचे कार्यवाह शिनाथ दराडे यांनी केली आहे. तसे झाल्यास मुंबईतील विद्यार्थ्यांनाही फायदा होईल असेही ते म्हणाले.

488 आदर्श शाळा यादी Download - Click Here


तसेच दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा भरेल असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये दर शनिवारी वेगवेगळे उपक्रम घेवून मुलांचे मनोरंनात्मक पध्दतीने अध्ययन अध्यापन होईल.

शिक्षकांना पाच वर्षांचा कालावधी
या शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती ही ज्यांना काम करायची इच्छा आहे त्यांची योग्य निवडपद्धतीने केली जाणार आहे. तसेच या शिक्षकांना पाच वर्षे कालावधीसाठी या शाळेत सेवा देता येणार आहे तर पाच वर्षे त्यांना बदलीची विनंती करता येणार नाही असेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

close