Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राज्यातील 300 आदर्श शाळांमध्ये होणार इच्छूक शिक्षकांची निवड...

राज्यातील ३०० जिल्हापरिषद शाळांची आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे. या शाळांचा शैक्षणिक, भौतिक विकास करण्यात येणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.   
Download GR Click Here 
या निवडलेल्या शाळा पहिली ते सातवीच्या असून त्यांना आठवीचे वर्ग जोडण्यात येणार आहेत. या शाळांचा विविध स्तरावर विकास केला जाणार आहे. यात भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, आयसीटी आणि विज्ञान प्रयोगशाळा यांचा समावेश असणार आहे. तर शैक्षणिक सुविधांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाच्या चौकटी बाहेरील शिक्षण दिले जाणार आहे. 
या शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती ही ज्यांना काम करायची इच्छा आहे त्यांची योग्य निवडपद्धतीने केली जाणार आहे. तसेच या शिक्षकांना पाच वर्षे कालावधीसाठी या शाळेत सेवा देता येणार आहे तर पाच वर्षे त्यांना बदलीची विनंती करता येणार नाही असेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

1 Comments

  1. In rural area on line exam will notaffordablenot not only Mumbai Pune students concern Alot of parent not to give their Mobile

    ReplyDelete

close