Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2024 गुणपडताळणी कशी करावी? नावात बदल असेल तर काय करावे?

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2024 जाहीर करण्यात आला आहे. त्या गुणांवर आक्षेप असेल तर तुम्हांला तुमच्या पेपरची गुणपडताळणी करता येईल. तसेच नावात काही बदल करायचा असेल तरीही करु शकता. 

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2024

निकाल कसा पहावा Video पहा.

5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.

School login Click Here

Student login Click Here


शिष्यवृत्ती परीक्षा 2024 अंतिम उत्तरसूची - Click Here


शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी घटकनिहाय online test, video, PDF, notes साठी पुढील वेबसाइटला भेट द्या. 



तुमच्या पेपरची गुणपडताळणी कशी कराल? 

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. 29/04/2024 ते 09/05/2024 या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे. 

गुणपडताळणी करण्यासाठी शाळा लॉगीन लिंक - Click Here

शाळा लॉगीन केल्यानंतर डावीकडील 5th std mark verification apply येथे टच करावे. 

शाळा लॉगीन केल्यानंतर डावीकडील 8th std mark verification apply येथे टच करावे. 


विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.


विद्यार्थ्यांच्या माहितीतील / नावातील बदल कसा करावा? 

विद्यार्थ्याचे नाव, आडनाव वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी/ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी दि. 09/05/2024 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत, विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

नाव व इतर माहिती मधील बदल करण्यासाठी लिंक - Click Here

विद्यार्थी आवेदनपत्रातील विद्यार्थ्यांचे आडनाव, प्रथम नाव, वडिलांचे नाव, जन्म दिनांक, दिव्यांग व आरक्षणाचा प्रवर्ग या बाबींमध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास त्याच्या नावासमोरील Imp Edit या बटनावर क्लिक करावे. तसेच इतर माहितीत काही दुरुस्ती करावयाची असल्यास Edit या बटनावर क्लिक करावे.

Post a Comment

0 Comments

close