Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक 2023 मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर

भारत निवडणूक आयोगाने 29 डिसेंबर 2022 च्या प्रसिध्दी पत्रकान्वये महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
यामध्ये नाशिक विभाग व अमरावती विभाग हे 2 पदवीधर तर नागपूर विभाग, कोकण विभाग व औरंगाबाद विभाग या 3 शिक्षक मतदार संघात निवडणूक होत आहे. सदर सदस्यांची मुदत 07-02-2023 रोजी समाप्त होत आहे. सदर निवडणूकीचे मतदान 30 जानेवारी 2023  रोजी होणार आहे. 


या निवडणूकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तिक रजा देणे आवश्यक आहे.


       रजा देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 23.06.2019 च्या शासन निर्णयानुसार मतदान यादीत नाव असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. सदर रजा ही कर्मचाऱ्यांना अनुदेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे.







हे ही वाचा.

Post a Comment

0 Comments

close