MSCIT संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत पूर्वीचीच मुदतवाढीस नकारबाबत शासन आदेश जारी... सोबतच अतिप्रदान करण्यात आलेल्या वसुलीचे आदेश...
20 जुलै 2002 च्या शासन निर्णयानुसार जे अधिकारी व कर्मचारी विहित मुदतीत संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करणार नाहीत, अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. परंतू ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांची वेतनवाढ रोखने आवश्यक होते, परंतू ती न रोखल्यामुळे अतिप्रदान करण्यात आलेल्या वेतनाच्या वसुलीस 20 नोव्हेंबर 2018 च्या परिपत्रकान्वये स्थगिती देण्यात आली होती.
आजच्या नवीन शासन निर्णयानुसार
1) राज्य शासकीय सेवेतील गट अ, गट ब, गट क, मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम मुदत पूर्वीचीच म्हणजे 31.12.2007 हीच अंतिम मुदत राहील.
2) राज्य शासकीय सेवेतील गट अ, गट ब, गट क, मधील ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर केले नाही, अशा कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखणे आवश्यक होते, परंतू वेतनवाढ न रोखल्यामुळे अतिप्रदान करण्यात आलेल्या वेतनाची वसुली न करण्याबाबत 20 नोव्हेंबर 2018 रोजी परिपत्रक जारी केले होते. सदर शासन निर्णयान्वये अतिप्रदान करण्यात आलेल्या वेतनाच्या वसुलीस 20 नोव्हेंबर 2018 च्या परिपत्रकान्वये स्थगिती देण्यात येणारे हे परिपत्रक या निर्णयामुळे अधिक्रमित करण्यात येत आहे.
महत्त्वाचे
हे ही वाचा
*विनाअट वरिष्ठ व निवडश्रेणी लागू करण्यासंदर्भातील शासन निर्णय*
👇
*वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी संबंधित आतापर्यंत चे सर्व शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.*
👇
Tags
शैक्षणिक बातम्या
संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत
0 Comments