Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ठसे चित्र विविध नमूने

लहान मुलांना चित्र काढायला खूप आवडते. त्यातच जर ठसे चित्र काढायला मिळाले तर त्यांचा आनंद आणखी द्विगुणित होतो. ठसे चित्र म्हणजे बोटांना किंवा विविध प्रकारचे काप घेवून त्याला रंग अथवा शाई लावून ते कोऱ्या कागदावर उमटवणे. ठसे चित्र हा लहान मुलांच्या आवडीचा विषय. त्यांच्यासाठी ठसे काम केलेले विविध नमूना आम्ही येथे उपलब्ध करुन दिलेले आहेत. ते सर्व तुम्हांला आवडतील. 

बोटांचे ठसे चित्र
ठसे चित्र हे वेगवेगळ्या प्रकारचे ठसे वापरुन काढले जाते. यामध्ये बोटांच्या ठशाद्वारे काढलेल्या चित्रांचे ठसे लहान मुलांचे अतिशय आवडीचे चित्र असते. बोटांच्या ठशाच्या साहाय्याने खूप वेगवेगळी चित्रे काढता येतात. 

    
फळभाज्यांचे काप घेऊन चित्र   
     बोटांच्या ठशाबरोबरच विविध फळभाज्यांचे काप घेवून आकर्षक अशी चित्रे काढता येतात. यामध्ये भेंडी, कांदा, बटाटा, लसूण, चवळी यांचे काप घेवून चित्रे काढली जातात. साधारणपणे 3 री 4 थी तील मुले अशा प्रकारची चित्रे स्वत:च्या कल्पना वापरुन सुंदर काढू शकतात. 




नैसर्गिक वस्तूंचे काप यांच्यापासून चित्र
   नैसर्गिक वस्तू जसे पाने, बिया, गवत, छोट्या काड्या, फुले, कळ्या यांच्या साहाय्याने सुद्धा आकर्षक अशी चित्रे / डिझाईन काढता येतात. साधारणपणे इ ५ वी च्या पुढील मुले अशा प्रकारची सुंदर चित्रे काढू शकतात.

हे ही पहा.

बटण चित्रे

Post a Comment

0 Comments

close