Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कविता - इंग्लिश मिडीयम च्या नाकावर टिच्चून सांगून गेला झेडपीचा मराठी मास्तर पुरस्कार घेऊन गेला !

इंग्लिश मिडीयम च्या
 नाकावर टिच्चून सांगून गेला
 झेडपीचा मराठी मास्तर
 पुरस्कार घेऊन गेला !
 इंग्रजी म्हणजे गुणवत्ता
 कुठलेच समीकरण नाही
 मातृभाषेत शिकले तरच
 विद्यार्थी गुणवान होईल 
ज्ञान असेल तर मार्ग दिसेल
 हेच शिकवून गेला
झेडपीचा मराठी मास्तर पुरस्कार घेऊन गेला !
सूटबूट महागडे क्लासेस
 ज्ञानाचा दर्जा ठरतो का
 इंग्रजी श्रेष्ठ मराठी कनिष्ठ
 न्यूनगंड मनाशी धरतो का
 तोडून सारे पाश मनाचे          
नवे स्वप्न दाखवून गेला
 झेडपीचा मराठी मास्तर
 पुरस्कार घेऊन गेला ! 
मराठी शाळा बंद पडल्यास नवे प्रश्न निर्माण होतील
 इंग्रजाळलेल्या या देशात
 भाषेचे भवितव्य धोक्यात
 येईल 
भाषा टिकली तर संस्कृती टिकेल
 नवा विचार देऊन गेला
 झेडपी चा मराठी मास्तर सात कोटी रूपयांचा जगातील शैक्षणिक नोबेल..
 पुरस्कार घेऊन गेला !📚📚🖍️🖊️

Post a Comment

0 Comments

close