Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

cbse exam - 10 वी व 12 वी परीक्षा 4 मे पासून सुरु,.... प्रॅक्टिकल परीक्षा 1 मार्च पासून

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा ४ मेपासून सुरू होणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी गुरुवारी सांगितले. या परीक्षा 10 जूनपर्यंत पूर्ण होतील. परीक्षा संपल्यानंतर 15 जुलैपर्यंत निकाल जाहीर होईल. दहावी आणि बारावी बोर्डाच्या प्रायोगिक परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहेत. त्यामध्ये प्रॅक्टीकल्स, प्रोजेक्ट्सचा समावेश असेल.


   कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव झाल्याने सर्वच क्षेत्रांना याचा मोठा फटका बसला आहे. शैक्षणिक क्षेत्रास देखील यामुळे अनेक बदल होत असल्याचे दिसून येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या बोर्डांच्या परीक्षांचे वेध लागण्यास आता सुरुवात झाली आहे.

अशातच, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक स्ट्रेन आढळून आल्यानं केंद्र सरकार अधिक सतर्क झालं आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी वर्तवलेल्या कोरोना लाटेचा अंदाज देखील केंद्राने येत्या काळातील नियोजनासाठी लक्षात घेतला आहे. भारतात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून केंद्राने पावले उचलले आहेत.

त्यामुळेच CBSE बोर्डाच्या परीक्षेबाबतही केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये CBSE बोर्डाची परीक्षा होणार नसल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली होती. आता, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी नेमक्या परीक्षा कधी होणार याच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

‘१० वी, १२ वी CBSE बोर्डाच्या परीक्षा ४ मे पासून घेण्याचं आम्ही ठरवलं आहे. १० जून २०२१ पर्यंत या परीक्षा घेतल्या जातील आणि १५ जुलैपर्यंत या परीक्षांचा निकाल लावला जाईल,’ अशी माहिती त्यांनी दिली आहे. अद्याप सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलं नसलं तरी कालावधी निश्चित केला गेला आहे.

यासोबतच, १० वी आणि १२ वीच्या प्रयोग परीक्षा(प्रॅक्टिकल), प्रोजेक्ट आणि अंतर्गत गुणवत्ता चाचण्या १ मार्च पासून ते लेखी परीक्षांच्या तारखेआधी घेण्यासाठी देखील महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे. लवकरच लेखी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केली जाईल,’ अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे.
अधिक मामाहितीसाठी https://cbse.nic.in/newsite/index.html या वेबसाईटला भेट द्या.

Tags
CBSE Exam 10th 12th
CBSE Exam 2020-2021 timetable
CBSE Exam date 2021
सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक
सीबीएसई बोर्ड 10वी 12वी परीक्षा

Post a Comment

0 Comments

close