Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 खेळणी विषय, खेळणी प्रकार, सहभागी स्तर

राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 मध्ये सहभागी होण्यासाठी खेळणी तयार करण्याचे विषय व खेळणी प्रकार व सहभागी होण्यासाठी स्तर माहिती असणे आवश्यक आहे. 


विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये खेळणी / खेळाद्वारे शिक्षण हा महत्त्वाचा भाग मानला जातो. खेळणी विद्यार्थ्यांना विविध कृतीमध्ये गुंतवून ठेवतात.  यामुळे विद्यार्थ्यांचे समस्या निराकरण कौशल्य, ज्ञानेंद्रियांना चालना, सृजनशीलता, कल्पकता, कारक कौशल्य अशा प्रकारची अनेक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मदत होत असते. कालानिहाय खेळण्यांचे प्रमाण, स्वरुप बदलले असले तरी त्यांचे महत्त्व कमी झालेले नाही. 

राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 साठी खेळणी विषय

1- भारतीय संस्कृती व इतिहास, माहितीचे अध्ययन यासाठी खेळणी

2- सामाजिक आणि मानवी मुल्य, विविध व्यवसाय, पर्यावरण यांचे अध्ययनास उपयुक्त खेळणी

3- दिव्यांग मुलांसाठी खेळणी

4- शारीरिक सुदृढता आणि क्रीडेसाठी खेळणी

5- Out of Box - Creative and fun

6- पारंपारिक भारतीय खेळण्याचे नवे रुप


राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 खेळणी प्रकार - कशा प्रकारची खेळणी बनवाल?

1- भारतीय खेळणी किंवा खेळ

2- ऑनलाईन खेळणी - मोबाईल/वेब ॲप, डिजिटल खेळणी

3- प्रत्यक्ष खेळणी (physical toys) - इलेक्ट्रॉनिक आधारित,बोर्ड गेम/कार्ड गेम, कोडी/बोर्ड कोडी/डिजिटल कोडी, puppets making, clay modelling, craft, material based, static toys, moving toys...

4- विविध वयोगट आणि स्तरासाठी शैक्षणिक किट्स (मॅन्युअल सह)

5- DIY - Do it yourself ( वर्गात विद्यार्थ्यांनी तयार केलेली असावीत.)

राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 निमित्त खेळ/खेळणी तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना वाचण्यासाठी येथे टच करा.

सहभागी होण्यासाठी स्तर

१- प्राथमिक स्तर - पहिली ते पाचवी

२- उच्च प्राथमिक स्तर - सहावी ते आठवी

३- माध्यमिक स्तर - नववी ते दहावी

४- उच्च माध्यमिक स्तर - अकरावी ते बारावी

Post a Comment

1 Comments

close