Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 निमित्त खेळणी व खेळ तयार करण्यासाठी मार्गदर्शक सूचना

राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 ही ऑनलाईन पध्दतीने 27.02.2021 ते 02.03.2021 या कालावधीत होणार आहे. या ऑनलाईन जत्रेमध्ये विविध खेळ व खेळणी तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना माहिती असणे आवश्यक आहे. 

खेळणी व खेळ बनविण्यासंदर्भात ऑनलाईन कार्यशाळेतील खेळनिहाय नियोजन व दररोजची लिंकसाठी येथे टच करा.

राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 मध्ये सहभागी होण्यासाठी येथे टच करा.

खेळणी किंवा खेळ तयार करण्यासाठी मार्गदर्शक सूचना

१) नेमून दिलेल्या कोणत्याही स्तरासाठी, विषयासाठी, कोणत्याही प्रकारची खेळणी तयार करता येतील.

२) सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वत: खेळणी तयार करणे बंधनकारक असेल. खेळणी तयार करण्याची प्रक्रिया फोटो आणि व्हिडिओ द्वारे रेकॉर्ड करण्यात यावी. सादरीकरणासाठी डेमो व्हिडिओ तयार करताना तो हिंदी किंवा इंग्रजी भाषेत सर्वांत:च्या आवाजात रेकॉर्ड केलेला आणि खेळणे कसे वापरावे याचा आशय असलेला तयार करण्यात यावा.

३) खेळणी किंवा खेळ कोणत्या संकल्पनेसाठी/कौशल्यासाठी उपयुक्त ठरेल ते माहितीमध्ये देण्यात यावे.

४) प्रत्येक खेळ/खेळणी सोबत खालीलप्रमाणे माहिती देणे आवश्यक राहील.

अ) उद्दिष्टे ब) वयोगट किंवा शिक्षणाचा सर्वत्र क) वापरलेले साहित्य ड) लागलेला वेळ इ) संकल्पना किंवा कौशल्य ई) किंमत उ) प्रक्रिया- खेळ / खेळणी वापरण्याची पद्धत

५)खेळ/खेळणी कशी वापरावी यांचे साध्या व सोप्या भाषेत स्पष्टीकरण द्यावे.

६) स्थानिक व पर्यावरण पूरक साहित्य वापरण्यास प्राधान्य देण्यात यावे.

७) सर्व विद्यार्थ्यांना हाताळता येतील अशा प्रकारचे खेळण्यांचे स्वरुप असावे.

८) तयार केलेली खेळणी टिकाऊ, सुरक्षित आणि कमी खर्चिक असावित.

९) खेळणी बनविताना विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती आणि चिकित्सक विचार, कौशल्य विकसन, यावर विचार करण्यात यावा.

१०) राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 ही ऑनलाईन / आभासी पद्धतीने होणार आहे. त्यामुळे खेळणी निर्मिती दरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ संकल्पना नोट्सह देणे बंधनकारक आहे.

राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 खेळणी विषय, प्रकार आणि सहभागी स्तर माहिती साठी येथे टच करा.

डिजिटल खेळ आणि इलेक्ट्रॉनिक खेळणी तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना

💥 डिजिटल गेम्स डिजिटल स्वरुपामध्ये ऑनलाईन पध्दतीने वापरण्यास दिले जातात. वेब आधारित आणि मोबाईल ॲप्लिकेशन आधारित खेळ खालीलप्रमाणे तयार करता येतील.

1- argmented reality application

2- simulations

3- artificial intelligence

4- STEM Toys ( Science, Technology, Engineering, Maths)

5- Virtual reality

6- Virtual tours

7- Robotics

8- पारंपारिक भारतीय खेळण्यांना डिजिटल स्वरुप देणे

💥 संकल्पना नोट - प्रत्येक डिजिटल गेमसाठी खालील प्रकारे संकल्पना नोट तयार करण्यात यावी.

1- खेळाडू कोण असणार आहे?

2- गेमची उद्दिष्टे

3- गेम्समध्ये असलेली चिकित्सक विचार आणि समस्या निराकरण कौशल्ये

4- खेळाडूंना येणाऱ्या अनुभवांचे स्पष्टीकरण (जिंकणे, लेवल संपादणूक, सहकार्य, पायऱ्या)

5- गेममध्ये अध्ययन आणि आनंद कसे अंतर्भूत आहेत त्याचे स्पष्टीकरण

6- खेळाडूंच्या अंतर्गत प्रेरणेला कशाप्रकारे प्रतिसाद देता येईल?


💥 तांत्रिक स्पष्टीकरण

1- वापरलेले ट्युल्स/ सॉफ्टवेअर/गेम इंजिन

2- गेमसाठी प्लॅटफॉर्म - मोबाईल/लॅपटॉप/प्ले स्टेशन इ.

3- दीक्षा ॲप व पोर्टलला कशाप्रकारे जोडता येईल?


वरील मार्गदर्शक सूचना व नियोजन अधिकाधिक शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सहकार्य करावे.

Post a Comment

0 Comments

close