National Toy Fair online workshop राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 च्यानिमित्ताने आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळेसाठी शिक्षक व विद्यार्थी यांनी उपस्थित राहावे.
विविध खेळ (Online games) व खेळणी तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला चालना देणे व ती सादर करण्याची संधी देणे या हेतूने आर्टस आणि अस्थेटिक्स विभाग, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांचेमार्फत देशातील पहिली राष्ट्रीय खेळणी जत्रा २०२१ National Toy Fair 2021 चे आयोजन ऑनलाईन पद्धतीने दि.27.02.2021ते 02.03.2021 या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे.
![]() |
शिक्षक व विद्यार्थी यांसाठी ऑनलाइन कार्यशाळा
शिक्षक आणि विद्यार्थी यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या खेळण्यांचे फोटो आणि व्हिडिओ यांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर आभासी पद्धतीने होणाऱ्या जत्रेमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे. राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 मध्ये राज्याचे उत्कृष्टरित्या प्रतिनिधित्व करण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकाद्वारे मार्गदर्शन व्हावे, यासाठी दि. 10/01/2021 ते दि. 13/01/2021 या कालावधीत राज्यस्तरीय ऑनलाइन कार्यशाळेचे नियोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच अधिकारी सहभागी होवू शकतात. सर्व शिक्षकांनी या कार्यशाळेचा लाभ घेवून राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 या उपक्रमात सहभागी व्हावे.राज्यस्तरीय ऑनलाइन कार्यशाळा विषय व वेळापत्रक
रविवार दि.१०.०१.२०२१
११.०० ते १२.०० उद्घाटन
१२.३० - toys from trash
०१.३० - परंपरागत खेळण्यापासून नाविन्यपूर्ण खेळणी
सोमवार दि.११.०१.२०२१
११.०० - fun with toys
१२.०० - टाकाऊ पासून हस्तकलाकृती / खेळणी निर्मिती
१.३० - Origami toys कागदी खेळणी
२.३० - DIY Toys
राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 बाबत राज्याचे नियोजन पहा.
राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 खेळणी विषय, प्रकार आणि सहभागी स्तर माहिती साठी येथे टच करा.
💥 राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 मध्ये सहभागी होण्यासाठी येथे टच करा.
मंगळवार दि.१२.०१.२०२१
११.०० - Game development through scratch software
१२.०० - toy making विज्ञान खेळणी
१.३० - Game development through python programming
२.३० - clay modelling
बुधवार दि.१३.०१.२०२१
११.०० - खेळणी बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध यंत्रणा
१२.०० - sensor technology
१.३० - Puppets making
२.३० - समारोप
कार्यशाळेसाठी लिंक
सदर कार्यशाळा यु ट्युब चॅनेल द्वारे होणार असून त्याच्या तारखेनुसार लिंक खालीलप्रमाणे आहेत.
दि.10.01.2021 https://youtu.be/n7bLUKTJPU0
दि. 11.01.2021 https://youtu.be/KKNVe9mqeBE
दि. 12.01.2021
दि. 13.01.2021
सदर कार्यशाळेत विविध अभ्यासपूरक खेळ (ऑनलाइन गेम्स) व खेळणी तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेमुळे तुम्हांला राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 या उपक्रमात उत्कृष्टरित्या सहभागी होता येईल. तसेच तुम्ही उत्कृष्टरित्या राज्याचे प्रतिनिधित्व कराल.
राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 ऑनलाइन कार्यशाळेत सहभागी होणेसाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी यांच्यापर्यंत ही पोस्ट शेअर करा.
0 Comments