Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रचंड वादानंतर WhatsApp ची प्रायव्हसी पॉलिसी अपडेटला स्थगिती...

फेसबुकची मालकी असलेली कंपनी व्हॉट्सअॲपने नुकतीच त्यांच्या प्रायव्हसी अपडेट करण्याचा प्लान स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कंपनीच्या म्हणण्यानुसार यामुळे युजर्संना पॉलिसी संबंधी जाणून घेण्यासाठी आणि त्याची समिक्षा करण्यासाठी जास्त वेळ मिळेल. व्हॉट्सॲपने सांगितले की, लोकांमध्ये या अपडेटची चुकीची माहिती जास्त पसरली आहे. त्यामुळे कंपनीने प्रायव्हसी अपडेट थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

व्हॉट्सॲप ने आपल्या ट्वीटर अकाउंट वरुन स्पष्ट केले आहे की, आम्ही युजरचा कसलाही डाटा शेअर करत नाहीत. युजरर्सनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

युजरची सुरक्षा ही आमच्यासाठी मोठी गोष्ट असून आम्ही युजरची कोणतीही माहिती कोणासोबत ही शेअर करत नाही. आम्ही आपल्या खाजगी संदेशांना एंड-टू-एंड एनक्रिप्शनसह संरक्षित करत आहोत. त्यामुळे युजर्स नी घाबरुन जावू नये.

काय म्हटले आहे WhatsApp ने

  • WhatsApp तुमचे कोणतेही कॉल्स ऐकत नाही.
  • WhatsApp तुमचे कोणतेही खाजगी मेसेज पाहत नाही.
  • WhatsApp तुमचे कोणतेही लोकेशन शेअर करत नाही.
  • WhatsApp तुमचे कोणतेही कॉन्टॅक्ट फेसबूक सोबत शेअर करत नाही.
  • WhatsApp समूह पूर्णतः सुरक्षित आहेत. 
  • तुमच्या फोनवर disappearing message ही सेटिंग सुरु करु शकता. या सेटिंग मुळे सात दिवसांत तुमचे संदेश डिलीट होतात.
  • तुम्ही तुमचा डाटा डाऊनलोड करु शकता.

Twitter message

We want to address some rumors and be 100% clear we continue to protect your private messages with end-to-end encryption.

आम्ही काही अफवांवर लक्ष देऊ इच्छितो आणि 100% स्पष्ट होऊ इच्छितो आम्ही आपल्या खाजगी संदेशांना एंड-टू-एंड एनक्रिप्शनसह संरक्षित करत आहोत.




Post a Comment

0 Comments

close