Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पालकांची आर्थिक पिळवणूक थांबणार.. शाळांनी विविध अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क वेबसाइटवर अपलोड करण्याचे आदेश.

राज्यातील खासगी शाळा आणि महाविद्यालयांनी विविध अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क त्याचप्रमाणे इतर सुविधांची माहिती आपल्या संकेतस्थळावर सादर करण्याचे आदेश शुल्क नियामक प्राधिकरणाने शैक्षणिक संस्थांना दिले आहे. 

ज्या शैक्षणिक संस्थांनी ही माहिती सादर केली नाही त्यांनी नोटिस मिळाल्याच्या तीन दिवसात ही कार्यवाही करण्याचे आदेशदेखील शैक्षणिक संस्थांना दिले आहे. त्यामुळे शाळा – महाविद्यालयांकडून आकारण्यात येणाऱ्या वाढीव शुल्कबाबत शुल्क नियामक प्राधिकरणने जोरदार हालचाली सुरु केल्या असल्याचे यावेळी समजते

useful 

शुल्क नियामक प्राधिकरण च्या वेबसाइटवर जाण्यासाठी येथे टच करा. 

महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी शैक्षणिक संस्था अधिनियम २०१५ नुसार राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थांना विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी किती शुल्क आकारण्याची परवानगी मिळाली आहे ती सर्व माहिती शाळा – महाविद्यालयांना आपल्या माहिती पुस्तिका आणि संकेतस्थळावर नमूद करण्याची सक्ती असते. मात्र राज्यातील अनेक शाळा – महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्क माहिती पुस्तिकेवर दिलेल्या रक्क्मेपेक्षा जास्त घेत असल्याचे निदर्शना आले होते. त्यामुळे पालकांची होणारी लूट थांबविण्यासाठी शुल्क नियामक प्राधिकरणाने हालचाल सुरु केली आहे. 

वाचा - दहावी - बारावीच्या परीक्षेसाठी 75%च अभ्यासक्रम... कमी केलेला 25% अभ्यासक्रम डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

प्रधिकरणाने शैक्षणिक संस्थांना नोटिस पाठवून विविध अभ्यासक्रम प्रवेशाचे शुल्क, ग्रंथालय, मैदाने, ट्यूशन शुल्क असे विद्यार्थ्यांकडून अभ्यासक्रम नुसार आकारण्यात येणाऱ्या सर्व शुल्काची माहिती शाळा – महाविद्यालयांनी आपल्या संकेतस्थळावर जाहीर करण्याचे आदेश दिले आहे. त्याचप्रमाणे अल्पसंख्याक शैक्षणिक सस्थांनादेखील हे नियम लागू असणार आहे. ही सर्व माहिती शाळा – महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना कळेल अशा भाषेत कळविण्याचे आपल्या नोटिस मध्ये स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे ही सर्व माहिती शैक्षणिक संस्थांनी प्रधिकरणाला कळविण्याचे यावेळी आदेश दिले आहे. शैक्षणिक सस्थांनी नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी शुल्क नियामक प्रधिकरणाने दिले आहे.

 Latest update -  JNVST 2021 admit card released जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा प्रवेशपत्र जाहीर. डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक

Post a Comment

0 Comments

close