Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सीबीएसई दहावीच्या बोर्ड परीक्षा २०२१ रद्द

सध्या सुरू असलेल्या कोविड -१९ च्या आपत्कालीन परिस्थितीमुळे सीबीएसई दहावीच्या बोर्ड परीक्षा २०२१ रद्द करण्यात आल्या आहेत.  तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 


सीबीएसई दहावीच्या बोर्ड परीक्षा 4 मे पासून घेण्यात येणार होत्या. परंतू वाढत्या कोरोना केसेस मुळे आता दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार नाहीत. त्यामुळे वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. 

हे ही वाचा - दिल्लीतील सरकारी शाळेमध्ये आता cbse ऐवजी दिल्ली बोर्डाचा अभ्यासक्रम - मुख्यमंत्री केजरीवल

सीबीएसई दहावी मंडळाचे निकाल मंडळाने तयार केलेल्या उद्दीष्ट निकषांच्या ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरियानुसार तयार करण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. जे विद्यार्थी अशा प्रकारे गुणदान करण्याविषयी समाधानी नसतील त्यांची परीक्षा घेतली जाईल असे शिक्षणमंत्री डॉ.रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केले आहे. गुणपत्रिकांसाठी सीबीएसई बोर्डाकडून विशिष्ट प्रणाली तयार केली जाणार आहे. 



बारावीच्या परीक्षेबाबत १ जून रोजी होणार निर्णय

 बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून आता १ जून रोजी CBSE कडून करोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. साधारणपणे १५ दिवस अगोदर विद्यार्थ्यांना याबाबत सूचना दिली जाईल. नंतरच परीक्षा घेण्यात येतील, असे डॉ रमेश पोखरियाल यांनी सांगितले आहे. 

Post a Comment

0 Comments

close