Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महा करिअर पोर्टल - अडीच लाख अभ्यासक्रमाची माहिती एका क्लिकवर... महा करिअर पोर्टलवर लॉगीन कसे करावे❓ महाकरिअर पोर्टल कसे वापरावे?

शासनाने महाकरिअर पोर्टल विकसित केले असून या महा करिअर पोर्टलवर अडीच लाख अभ्यासक्रमांची माहिती एका क्‍लिकवर मिळणार आहे. याचा लाभ राज्यातील 47 लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. 

करिअर मार्गदर्शन सन 2022-23 संपूर्ण वेळापत्रक व प्रशिक्षण वेबिनार लिंक - Click Here

दहावी, बारावीनंतर पुढे काय करावे? हा प्रश्न सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना भेडसावत असतो. याचे उत्तर शिक्षण विभागाने तयार केलेल्या महा करिअर पोर्टलवर मिळणार आहे. शिक्षण विभागाने "MahaCareer Portal" विकसित केले असून या माध्यमातून दोन लाख 60 हजार अभ्यासक्रमांची माहिती एकाच क्‍लिकवर उपलब्ध करुन दिलेली आहे.


आजच्या काळातील विद्यार्थ्यांना ज्ञान व जीवन कौशल्याची गरज लक्षात घेता शालेय शिक्षण विभागाने "महा करिअर पोर्टल' निर्माण केले आहे. राज्य महामंडळाच्या अनुदानित शाळांतील इ. 9वी ते इ. 12वी तील सुमारे 47 लाख विद्यार्थ्यांना महा करिअर पोर्टलवर लॉगीन करुन याचा लाभ घेता येणार आहे. 

महा करिअर पोर्टल वापराबाबत शासन परिपत्रक - Click Here

काय आहे महाकरिअर पोर्टलवर ❓ 

  • पोर्टलवर 16 देशांतील शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध आहे. 
  • सुमारे 2 लक्ष 60 हजार अभ्यासक्रमांची माहिती येथे मिळेल. 
  • 556 करिअर पाथवे, 
  • 21 हजार महाविद्यालये, 
  • साडेअकराशे प्रवेश परीक्षा, 
  • बाराशे पेक्षा जास्त शिष्यवृत्त्या 

वरील सर्व माहिती राज्य मंडळाच्या 9वी ते 12वी मधील 47 लक्ष विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. 

महा करिअर पोर्टल विशेष

पोर्टलमध्ये करिअर, कॉलेज, परीक्षा डिक्‍शनरी व स्कॉलरशिप, स्पर्धा व फेलोशिप बद्दल स्वतंत्र माहिती दिलेली आहे. तसेच यामध्ये प्रोफेशनल अभ्यासक्रम व वोकेशनल अभ्यासक्रम बद्दल माहिती मिळणार आहे. विशेष म्हणजे हे पोर्टल दर मिनिटाला अद्यावत होत असल्यामुळे प्रत्येक विषयाची अद्यावत माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे.


महाकरिअर पोर्टल लॉगीन कसे करावे❓

विद्यार्थ्यांनी आपल्या मुख्याध्यापक किंवा शिक्षकांकडून सरल युनिक आयडी प्राप्त करून घ्यावा. हा क्रमांक या पोर्टलचा युजर आयडी म्हणून टाकावा. याचा पासवर्ड एक ते सहा पर्यतचा अंक आहे. या पोर्टल मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वतंत्र डॅशबोर्ड राहणार आहे. नोंदणी तथा चौकशी केलेल्या अभ्यासक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे मिळणार आहे.

महाराष्ट्र करिअर App डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

महाकरिअर पोर्टलवर लॉगीन करण्यासाठी येथे टच करा. Click Here

For login

User Id - Student Saral ID (19 digit) 

Password - 123456 ( same for all student)



तणावाचे व्यवस्थापन - दहावी बारावी च्या परीक्षेतील तणावाचे व्यवस्थापन कसे कराल❓mscert पुणे व हार्टफुलनेस ट्रस्ट चे मार्गदर्शन तीन सत्राचे video पहा. 


Post a Comment

1 Comments

close