सीबीएसई बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सीबीएसईकडून सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला असून त्यानुसार सीबीएसई बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामध्ये दहावी, अकरावी आणि बारावीचे 30:30:40 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार - जिल्हा निवड समिती रचना व तिची कार्ये
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार - राज्य निवड समिती रचना व तिची कार्ये
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार - राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र निर्णायक मंडळ
कोरोना महामारीमुळे 1 जून रोजी सीबीएसई बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता बारावीच्या परीक्षेचं मूल्यमापन कसं केलं जाणार याची चर्चा सुरु होती. याता त्या संदर्भात सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयात बारावीच्या परीक्षेच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सादर केला आहे.
केंद्र सरकारच्या वतीने ॲटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालात खंडपीठासमोर सीबीएसई बोर्डाच्या दहावी, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकन पद्धतीचे निकष सादर केले. यानुसार, विद्यार्थ्याचे मूल्यांकन करण्यासाठी त्याचे दहावी, अकरावी आणि बारावीतील बेस्ट तीन विषयांचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. दहावीच्या गुणांसाठी ३० टक्के वेटेज, अकरावीच्या गुणांसाठी ३० टक्के वेटेज तर बारावीच्या गुणांसाठी ४० टक्के वेटेज दिले जाणार आहे. यासाठी टर्म परीक्षांच्या पाच पैकी तीन विषयांचे गुण विचारात घेतले जातील. दहावी, अकरावी आणि बारावीचे 30:30:40 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. यामध्ये दहावी अकरावी व बारावीतील सर्वात जास्त गुण असणारे तीन विषयाचे मार्क ग्राह्य धरले जाणार आहेत. बारावीसाठी बारावीच्या घटक, सत्र आणि प्रात्यक्षिक परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.
निकाल तयार करण्यासाठी प्रत्येक शाळेत निकाल समिती स्थापन करण्यात येईल. कोणत्याही विद्यार्थ्याला अनावश्यक वाढीव गुण मिळणार नाहीत, याची जबाबदारी या समितीवर असेल.
बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल आणि विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं केलं जाणार, हे ठरवण्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं एका समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीमध्ये शिक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव आणि वरिष्ठ आयएएस अधिकारी विपिन कुमार यांच्यासह 12 लोकांचा समावेश करण्यात आला होता.
0 Comments