सन २०२१-२२ च्या इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षेचे (CET) आयोजन मंडळामार्फत शनिवार दि. २१ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या कालावधीत करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षेचा निकाल दि.२८ मे, २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दतीनुसार दि. १६/०७/२०२१ रोजी जाहीर करण्यात आलेला आहे.
शासन निर्णय दि. २८ मे, २०२१ व दि. २४ जून, २०२१ नुसार इ. ११ वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये एक सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आयोजित करण्याचा निर्णय होऊन त्याचा तपशील निश्चित केलेला असून सदर परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत करण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत.
त्याअनुषंगाने सन २०२१-२२ च्या इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत शनिवार दि. २१ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या कालावधीत करण्यात येणार आहे. सदर परीक्षा ही राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील सन २०२१ - २२ मधील इ. ११ वी प्रवेशासाठी घेण्यात येणार आहे.
इ. 11 वी प्रवेशासाठी CET परीक्षेचे स्वरुप
१) सामाईक प्रवेश परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका/ पेपर असेल.
२) परीक्षेचा कालावधी 2 तास राहील.
२) या परीक्षेत इंग्रजी 25, गणित 25, विज्ञान 25 व समाजिक शास्त्र 25 असे एकूण 100 प्रश्न विचारले जातील.
३) परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल.
४) प्रश्न पत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे (Multiple Choice Objective Type Questions) असेल.
५) परीक्षा O.M.R. आधारीत असेल.
11th CET Syllabus -
11 वी प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती, नोंदणी व अर्ज करणे. सविस्तर माहिती पहा.
11 वी प्रवेश परीक्षा CET साठी अर्ज कसा करावा?
या परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण / प्रविष्ट झालेल्या इच्छूक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या संकेतस्थळावरुन आवेदनपत्र सादर करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची नवीन लिंक
https://cet.11thadmission.org.in
11वी प्रवेश परीक्षा CET साठी अर्ज करण्याची मुदत
11वी प्रवेश परीक्षा CET साठी अर्ज करण्याची सुविधा मंडळामार्फत दि.२6/०७/२०२१ रोजी दुपारी 3.00 पासून दि. 02/०8/२०२१ अखेर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
11th CET Syllabus -
11 वी प्रवेश परीक्षा CET साठीचा अभ्यासक्रम विषय व घटकनिहाय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
संगणक प्रणालीमध्ये आवेदनपत्र भरण्यासाठी खालील माहिती नोंदवावी लागणार आहे.
६) ई-मेल आयडी (उपलब्ध असल्यास)
७) पूर्वीचा मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे किंवा नव्याने नोंदविणे अनिवार्य आहे. ८) परीक्षेचे माध्यम, विद्यार्थ्यांने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल. तथापि सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यास एक माध्यम निश्चित करावे लागेल.
९) सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या / कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका / शहराचा विभाग (WARD) निश्चित करावा लागेल.
१०) ज्या विद्याथ्र्यांनी इ.१० वीचे आवेदनपत्र भरताना SEBC प्रवर्गांची नोंद केली आहे अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार खुला प्रवर्ग अथवा EWS हा प्रवर्ग निवडावा लागेल.
यापूर्वी 11 वी CET परीक्षेचा फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना.
आवेदनपत्र (अर्ज) कसा करावा?
१. इ. ११ वी सामायिक प्रवेश परीक्षा ही वैकल्पिक / ऐच्छिक स्वरूपाची असल्याने या परीक्षेस प्रविष्ट होवू इच्छिणाऱ्या विद्याथ्याने परीक्षेसाठी स्वतंत्र आवेदनपत्र भरणे आवश्यक असेल.
२. सदर आवेदनपत्र भरण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेस्थळावर जाऊन भरावित.
आवेदनपत्र / अर्ज करण्यासाठी लिंक
https://cet.11thadmission.org.in
वरील लिंक वरुन विद्यार्थ्याने प्रथम इ. १० वीला प्रविष्ट झालेल्या मंडळाचा प्रकार निवडावा. तद्नंतर विद्यार्थ्यांना त्यावर दिलेल्या सूचनांचे वाचन करून त्याप्रमाणे कार्यवाही करावी लागेल.
३. सदर सूचना वाचून त्या स्विकृत असलेबाबत संबंधित रकान्यात खूण (✔️) करावी.
11th CET संदर्भात बोर्डाचे परिपत्रक डाउनलोड करा.
।) राज्यमंडळामार्फत सन २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा उत्तीर्ण / प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी
१. विद्यार्थ्याने प्रथम संगणक प्रणालीमध्ये स्वतःचा बैठक क्रमांक व आईचे नाव याबाबतची इत्यादी माहिती भरावी. सदर माहिती सादर (Submit) केल्यानंतर उर्वरित रकान्यातील माहिती आपोआप भरली जाईल. विद्यार्थ्याने दिलेल्या रकान्यात त्याचा ई-मेल आयडी (उपलब्ध असल्यास) भरावा.
२. विद्यार्थ्याला परीक्षेसाठी माध्यमाची निवड करण्याचा विकल्प देण्यात आलेला आहे. इ. १० वीच्या परीक्षेचे माध्यमाप्रमाणे या परीक्षेसाठीचे माध्यम त्याने सदर रकान्यात निश्चित करावे. विद्यार्थ्यांने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल. तथापि, सामाजिक शास्त्रे ( इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यास इ. १० वीच्या माध्यमानुसार उर्वरित अन्य ७ माध्यमांपैकी एक माध्यम निश्चित करावे लागेल.
३. सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या / कायमच्या निवास स्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका / शहराचा विभाग निश्चित करण्याचा विकल्प देण्यात येईल, तो विद्यार्थ्यांनी निश्चित करावा. सदर परीक्षेला प्रविष्ट होणारी विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सदर विद्यार्थ्याने निवडलेल्या तालुक्यासाठी / शहरी विभागासाठी मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रापैकी कोणतेही एक केंद्र विद्यार्थ्याला परीक्षेसाठी देण्यात येईल.
४. उपरोक्तप्रमाणे माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्याने आवेदनपत्र सादर (Submit) करावे. तद्नंतर विद्यार्थ्याने आवेदनपत्राची प्रिंट काढून जतन करून ठेवावी.
५. उपरोक्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेसाठी वेगळे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
11th CET संदर्भात बोर्डाचे परिपत्रक डाउनलोड करा.
II) अन्य मंडळांमार्फत तसेच राज्यमंडळामार्फत (सन २०२१ पूर्वी) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षा उत्तीर्ण / प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी
१. विद्यार्थ्याने संगणक प्रणालीमध्ये दिलेल्या सर्व रकान्यातील माहिती अचूक भरावी.
२. विद्यार्थ्याला परीक्षेसाठी माध्यमाची निवड करण्याचा विकल्प देण्यात आलेला आहे. इ. १० वीच्या परीक्षेचे माध्यमाप्रमाणे या परीक्षेसाठीचे माध्यम त्याने सदर रकान्यात निश्चित करावे.
विद्यार्थ्यांने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल. तथापि, सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यास इ. १० वीच्या माध्यमानुसार उर्वरित अन्य ७ माध्यमांपैकी एक माध्यम निश्चित करावे लागेल.
३. सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या / कायमच्या निवास स्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका / शहराचा विभाग निश्चित करण्याचा विकल्प देण्यात येईल, तो विद्यार्थ्यांनी निश्चित करावा. सदर परीक्षेला प्रविष्ट होणारी विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सदर विद्यार्थ्याने निवडलेल्या तालुक्यासाठी / शहरी विभागासाठी मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रापैकी कोणतेही एक केंद्र विद्यार्थ्याला परीक्षेसाठी देण्यात येईल.
४. सदर विद्यार्थ्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी ओळख पडताळणीसाठी फोटो आयडी (शाळेचे ओळखपत्र,आधार कार्ड, इ.) पासपोर्ट साईझ फोटो व स्वाक्षरी नमूना संगणक प्रणालीवर अपलोड करणे अनिवार्य राहील.
५. दिव्यांग विद्यार्थ्यांनी आवेदनत्रात दिव्यांगत्वाचा प्रकार निवडून निश्चित करावा तसेच त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे संगणक प्रणालीवर अपलोड करावीत.
६. उपरोक्तप्रमाणे माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्याने आवेदनपत्र सादर (Submit) करावे. तद्नंतर विद्यार्थ्याने आवेदनपत्राची प्रिंट काढून जतन करून ठेवावी.
७. उपरोक्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेसाठी मंडळाने विहित केलेले शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरावे लागेल.
11वी प्रवेश परीक्षेसाठी शुल्क
इ. ११ वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा सन २०२१ साठी प्रविष्ट होणाऱ्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना (सन २०२१ च्या नियमित परीक्षेला नोंदणी केलेल्या) परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. मात्र सन २०२१ पूर्वी राज्यमंडळातून इ.१० वीची परीक्षा उत्तीर्ण / प्रविष्ट झालेले विद्यार्थी, C.B.S.E. C.I.S.C.E., सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे इत्यादी अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी मंडळाने विहित केल्याप्रमाणे प्रत्येकी रु. १७८/- शुल्क उपलब्ध करुन दिलेल्या पर्यायाद्वारे ऑनलाईन भरणे आवश्यक राहील. त्यासाठी Debit/Credit card उपलब्ध करुन दिले जातील, त्यापैकी एका पर्यायाद्वारे शुल्क भरावे. / UPI/ Net Banking व तत्सम पर्याय
11वी प्रवेश परीक्षेसाठी परीक्षा केंद्र
१. सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र निश्चित करताना त्याने आवेदनपत्रामध्ये नमूद केलेला जिल्हा व तालुका / शहरी भाग विचारात घेण्यात येईल.
२. विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रासाठी निश्चित केलेल्या तालुक्यामधून सदर परीक्षेसाठी प्रविष्ट होणारी विद्यार्थी संख्या विचारात घेऊन त्या तालुक्यासाठी मंडळामार्फत परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येतील. त्यापैकी एक केंद्र विद्यार्थ्याला देण्यात येईल.
11वी CET परीक्षेसाठी प्रवेशपत्र -
विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मंडळामार्फत ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन दिले जाईल. सदर प्रवेशपत्र विद्यार्थ्यांने डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून घ्यावी. प्रवेशपत्रावर दिलेल्या सर्व सूचना विचारात घेऊन विद्यार्थ्यांने परीक्षेस प्रविष्ट व्हावे. सदर प्रवेशपत्रावर विद्यार्थ्याची माहिती सदोष असल्यास अथवा फोटो नसल्यास यासंदर्भातील माहिती पुस्तिकेत दिलेल्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करावी.
इयत्ता 11 वी प्रवेशासाठी अशी होईल CET परीक्षा...
१. इयत्ता 11 वी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा पूर्णत: ऐच्छिक असेल.
२. सामाईक प्रवेश परीक्षा (CET) ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व मंडळांच्या राज्य मंडळ, C.B.S.E., C.I.S.C.E., सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे, इत्यादी विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात येईल.
३. सामाईक प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इ. १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल.
४. सदर परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेमध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील, परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल. प्रश्न पत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे (Multiple Choice Objective Type Questions) असेल, परीक्षा O.M.R. आधारीत असेल.
५. सदर सामाईक प्रवेश परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका/ पेपर असेल व परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.
वाचा - शाळा व्यवस्थापन समिती रचना व कार्य
६. सामाईक प्रवेश परीक्षा आयुक्त शिक्षण यांच्या देखरेखीखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ/ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात येईल. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ / परीक्षा परिषदेमार्फत घोषीत करण्यात येईल.
७. इ. ११ वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यासाठी पूर्णत: ऐच्छिक असल्याने; इयत्ता १० वीचा निकाल लागल्यानंतर राज्य मंडळ / परीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यासाठी परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी पर्याय (option) उपलब्ध करुन देण्यात येईल.
अशी होईल इयत्ता 11 वी ची प्रवेश प्रक्रिया
इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. म्हणजेच इ. ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या उर्वरित जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वीच्या मुल्यमापन पध्दतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील.



3 Comments
🙏Sir mi dipak ravindra Patil. 20 july Mi CET cha form bharala.sir mi semi english la ahe ani maza marathi madhyam houn gele ahe. Pan te durust karanyasathi mi prayatna ahe pan te atta hot nahi ahe. ''Durusti sathi *paryay* dyava''🙏 atta site chalu hot nahi ahe.
ReplyDeleteMedium चुकले आहे तर दुरुस्त करता येईल का?
ReplyDeletePlease send the cet form to us because of the late
ReplyDelete