सरल प्रणालीमध्ये नोंदणी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड मधील माहितीची तपासणी करणेबाबत राज्य प्रकल्प संचालक mpsp मुंबई यांनी परिपत्रक काढले आहे.
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती सरल प्रणाली मध्ये शाळास्तरावरुन मुख्याध्यापकांमार्फत संगणकीकृत करण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, जात, जन्मतारीख, आधारक्रमांक, लिंग, वर्ग, इयत्ता, पत्ता, जनरल रजिस्टर नंबर इत्यादी माहिती संगणीकृत करण्यात येत आहे.
परंतू सरल प्रणालीमधील विद्यार्थ्यांची माहिती आधार संस्थेकडून तपासून घेतली असता विद्यार्थ्यांची पटावरील नोंदणी व आधार कार्डवरील माहितीमध्ये तफावत असल्याचे दिसून आले आहे. सदर माहिती जिल्ह्यातील / तालुक्यातील अधिकाऱ्यामार्फत तात्काळ तपासुन घेण्यात यावी व माहितीमध्ये बदल करायचे असल्यास सरल प्रणालीमध्ये शाळाच्या मुख्याध्यापकांना बदल करण्याकरिता सुचना देण्यात याव्यात, असे परिपत्रकात म्हटले आहे.
0 Comments